वाढते प्रदूषण, खराब आहार आणि जीवनशैली दिवसेंदिवस बिघडत चालल्यामुळे लोकांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य समस्या म्हणजे केस पांढरे होणे. महिलांमध्ये केस पांढरे होण्याची समस्या आता फक्त पन्नाशीनंतरच्या वयोगटात राहिलेली नसून तिशी-पस्तिशीत अनेक जणींचे केस पांढरे होताहेत. साहजिकच यामुळे व्यक्मित्वावर नकारात्मक प्रभाव पडतो. या समस्येवर बटाट्याच्या सालीपासून बनवलेल्या डायचा वापर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे.
बटाट्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जस्त सारखी खनिजे बटाट्याच्या सालीमध्ये असलेल्या पाण्यात आढळतात. हे खनिजे केस गळणे थांबवण्यास तसेच पांढरे केस काळे होण्यास मदत करतात.
कसे वापरायचे ? सर्वप्रथम 5-6 मोठ्या बटाट्याची साले काढून घ्या. यानंतर, मंद आचेवर शिजवण्यासाठी त्यांना गॅसवर सोडा आणि पाणी घट्ट होईपर्यंत शिजवा. या पाण्यात गुलाबपाण्यात कोरफडीचा गर मिक्स करून डोक्याला लावू शकता.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …