कच्च्या दुधामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असते जे त्वचेमधील शिथिलता कमी करण्यास खूपच मदत करते आणि त्यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत. दुधामध्ये जास्त प्रमाणात फॅट्स असल्यामुळे कच्चे दूध वापरल्यावर वेगळे मॉईस्चराईजर वापरण्याची गरज भासत नाही.
* बाजारातील मॉईश्चराईजरपेक्षा नैसर्गिक दूध वापरणे अधिक चांगले आहे. तसंच लॅक्टिक अॅसिड असल्याने कच्च्या दुधामुळे त्वचेचे टॅनिंग कमी होऊन त्वचा उजळण्यास हातभार लागतो.
* यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर कच्च्या दुधाने चेहरा स्वच्छ करु शकता. रात्री झोपताना त्वचा डिहायड्रेट होते आणि कोरडी होते. दुधाने चेहर्यावर टोनिंग केल्यामुळे कोरड्या त्वचेपासून सुटका मिळते.
श्रयासाठी कापूस कच्च्या दुधामध्ये भिजवा आणि चेहर्याला लावा आणि त्यानंतर चेहर्यावर हलक्या हाताने मसाज करा. तुम्ही कापसाने कच्चे दूध डोळ्याखालीही लावा. यामुळे त्वचा डीप मॉईश्चराईज होते आणि चेहर्यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत मिळते. यामुळे त्वचेचे रक्ताभिसरण सुधारून रंग उजळण्यास मदत मिळते.
Check Also
सौंदर्यप्रसाधने वापरताय?
आजच्या युगात सुंदर दिसण्यासाठी स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. भारतातील सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ …