भारतात ‘स्वच्छ भारत मिशन’मुळे 2011 ते 2020 या दरम्यान वार्षिक 60 ते 70 हजार बालमृत्यु रोखण्यास मदत झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. देशातील 35 राज्य आणि 640 जिल्ह्यांतील बाल मृत्युदर आणि पाच वर्षांपर्यंतच्या बाळांचा मृत्युदराच्या आकड्यांचे आकलन करताना स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी आणि त्यापूर्वीची स्थिती याची तुलना करण्यात आली. यात देशात बालमृत्युच्या दरात मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले. ज्या जिल्ह्यात प्रामुख्याने स्वच्छतागृहाचे काम वेगाने झाले तेथे बालमृत्यूदरात 5.3 टक्के दराने घट दिसून आली. या योजनेला लाभलेले यश अनेकार्थांनी महत्त्वाचे आहे.
अलिकडेच विज्ञानावर आधारित ब्रिटिश मासिक ‘नेचर’मध्ये प्रकाशित ‘टॉयलेट कन्स्ट्रक्शन अंडर द स्वच्छ भारत मिशन अँड इन्फेट मॉर्टेलिटी इन इंडिया’ या अहवालात म्हटल्यानुसार भारतात ‘स्वच्छ भारत मिशन’मुळे 2011 ते 2020 या दरम्यान वार्षिक 60 ते 70 हजार बालमृत्यु रोखण्यास मदत मिळाली. कॅलिफोर्निया विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय खाद्य धोरण संशोधन संस्था आणि ओहियो स्टेट यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ आणि भारतातील बाल तसचे पाच वर्षोपक्षा कमी वयोगटातील मृत्युदरासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी अभ्यास केला. याप्रमाणे देशातील 35 राज्य आणि 640 जिल्ह्यांतील बाल मृत्युदर आणि पाच वर्षांपर्यंतच्या बाळांचा मृत्युदराच्या आकड्यांचे आकलन करताना स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी आणि त्यापूर्वीची स्थिती याची तुलना करण्यात आली. यात देशात बालमृत्युच्या दरात मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले. ज्या जिल्ह्यात प्रामुख्याने स्वच्छतागृहाचे काम वेगाने झाले तेथे बालमृत्यूदरात 5.3 टक्के दराने घट दिसून आली. 15 ऑगस्ट 2014 राोजी पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी देशाला उद्देशून बोलताना म्हणाले, “आपण आपल्या घरात, शाळेत, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहाची सुविधा आणू शकत नाही का? लाल किल्ल्यावरून ऐतिहासिक भाषणाची अपेक्षा केली जात असताना मैलापाणी आणि स्वच्छतागृहासंदर्भात मांडलेल्या माझ्या भूमिकेचे कौतुक होईल की नाही, मला ठूक नाही. पण पुढच्या वर्षी जेव्हा मी इथे उभा असेल तर तेव्हा प्रत्येक शाळेतील मुले आणि मुलींसाठी वेगवेगळे स्वच्छतागृह दिसायला हवे.” पंतप्रधानांच्या या आवाहनाचा सखोल परिणाम झाला. अर्थात मोदी यांच्या वक्तव्याकडे राजकीय दृष्टीकोनातून देखील पाहिले गेले, परंतु सर्व अडथळे पार करत ‘स्वच्छ भारत अभियाना’ने ऑक्टोबरमध्ये घेतलेली भरारी पाहता त्याचे आज सकारात्मक परिणाम दिसत आहेत.
ग्रामीण भागात उघडयावर शौचास जाण्याचे प्रमाण गंभीर आहे. पहाटेच्या वेळी रस्त्यालगत किंवा शेतात, आडबाजूला ग्रामस्थ शौचास जातात. परंतु आता हे चित्र बदलत आहे. उघड्यावर शौच केल्याने वातावरणावर आणि मानवी शरीरावर होणार्या गंभीर परिणामाची जाणीव लोकांना करून देण्यात आली. उघड्यावर शौच केल्याने नवजात बालकाचा मृत्यु कसा होऊ शकतो, यावर नागरिकांना विचार करण्यास या मोहिमेने भाग पाडले. या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी जुलै 2015 मध्ये प्रकाशित ‘रिस्क ऑफ अॅडव्हर्स प्रेग्नसी आउटकम्स अमंग वुमन प्रॅक्टिसिंग पुअर सॅनिटेशन इन रुरल इंडिया : अ पॉप्यूलेशन बेस्ड प्रोस्पेक्टिव्ह कोहार्ट स्टडी’च्या अभ्यास अहवालाचे निष्कर्ष जाणून घेतले पाहिजेत. या अभ्यासात 670 गर्भवतींचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनातून समोर आलेली बाब म्हणजे ज्या दोन तृतियांश गर्भवतींनी उघड्यावर शौच केले, त्यापैकी एक चर्तुथांश महिलांना बाळंतपणाच्या वेळी कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. यात समान आढळून येणारी बाब म्हणजे अशक्त बाळ जन्माला येणे किंवा मुदतपूर्वीच जन्म होणे या गोष्टी घडल्या. याचवेळी स्वच्छतागृहाचा वापर करणार्या गर्भवतींना अशा प्रकारचा अनुभव आला नाही.जागतिक पातळीवर यासंदर्भात असंख्य संशोधन करण्यात आल्यानंतर एक गोष्ट सिद्ध झाली आणि ती म्हणजे उघड्यावर शौचास जाणे आरोग्याला हानीकारक आहे.
‘सॅनिटेशन अँड डिसिज, हेल्थ एस्पेक्ट्स ऑफ वेस्ट वॉटर अँड एक्सक्रेट मॅनेजमेंट’ नावाच्या जागतिक बँकेचा अहवाल म्हणतो, उघड्यावर शौच हे थेटपणे पर्यावरणाच्या संपर्कात येते आणि त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. मानवी मलात लाखो संसर्ग, विषाणू असतात आणि त्यामुळे अतिसार, जलजन्य आजार पसरतो. सभोवताली सतत संसर्गजन्य आजाराचा प्रसार होत असेल तर बाळांचे पोट सतत बिघडत राहते आणि त्यामुळे त्यांचे पोषक तत्व पचविण्याची शक्ती कमी होते. ते कुपोषणाचा सामना करण्याची शक्ती गमावून बसतात. उघड्यावरच्या शौचापासून मुक्तीची बाब ही भारतीय बाळांसाठी जीवरक्षक म्हणूनच नाही तर त्याच्या आरोग्यावरचे सर्वंकष सकारात्मक परिणामही समोर आले आहेत.
स्वच्छतागृहांचा अभाव असणे हे एकप्रकारे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक अस्वस्थेला कारणीभूत आहे. 2017 मध्ये ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्वायरमेंट रिसर्च अँड पब्लिक हेल्थ’ मध्ये प्रकाशित अभ्यास अहवाल ‘असेसिंग वुमन्स निगेटिव्ह सॅनिटेशन इनसिक्युरिटी मेशर’ नुसार महिलांसाठी उघड्यावर शौाचास जाण्याची स्थिती ही केवळ त्यांच्यासाठी केवळ शारीरिक अडचणी निर्माण करणारी बाब ठरत नाही तर त्यांचा आत्मसन्मान आणि सुरक्षेला देखील ठेच पोचविणारी आहे. एका अभ्यासानुसार, स्वच्छतागृह सुविधाअभावी उघड्यावर शौच करण्याची वेळ येत असल्याने महिला देखील स्वत:चा आहार कमी ठेवतात आणि पाणीही कमी पितात. एकर्थाने स्वत:वर दिवसा शौचास जाण्याची वेळ येऊ नये यासाठी त्या आहाराचे प्रमाण कमीच ठेवतात. परिणामी त्यांना शारीरिक व्याधी होण्यास सुरुवात होते. अर्थात उघड्यावर शौच केल्याने मौखिक, शारीरिक अणि लैंगिंक अत्याचाराची शक्यता राहाते आणि या गोष्टी महिलांना शारीरिक व मानसिक त्रासाला कारणीभूत ठरू शकतात.
‘ऑल वुई व्हॅट आर टॉयलेट्स इनसाइड अवर होम्स: द क्रिटिकल रोल ऑफ सॅनिटेशन इन द लाइव्हस ऑफ अर्बन पुअर एंडारेलेसंट गर्ल्स इन बंगळूर इंडिया 2015’ मध्ये प्रकाशित अभ्यास अहवाल हा अल्पवयीन मुलींच्या वेदना व्यक्त करतो. यात उघड्यावर शौचास जावे लागत असल्याने त्यांना लाजीरवाणे जीणे जगावे लागते. अखेर ग्रामीण भागातील चित्र बदलण्यासाठी आणि यासारख्या अनंत अडचणींंवर मात करण्यासाठी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची सुरुवात झाली. परंतु ही मोहीम केवळ कागदावरच राहिल आणि त्याचा नुसता गाजावाजा होईल, असे बोलले गेले. परंतु तळागळापर्यंत या मोहिमेचे महत्त्व पटवले गेल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. स्वच्छता अभियानाचे चांगले परिणाम पाहवयाचे असेल तर ‘पेयजल आणि स्वच्छता विभाग तसेच जलशक्ती मंत्रालयाच्या मदतीने युनिसेफ व बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचा अहवाल (एक्सेस टू टॉयलेटस अँड द सेफ्टी कन्वियन्स अँड सेल्फ रिस्पेक्ट ऑफ वुमन इन इंडिया: सुरक्षा, सुविधा आणि स्वाभिमान) पाहा. या अहवालातून स्वच्छ भारत योजनेच्या सकारात्मक परिणाम समजतात.
शौचालयाच्या बांधकामामुळे 93 टक्के महिलांच्या मनातील शौचावेळी असणारी प्राण्यांची भीती किंवा संसर्ग होण्याची भीती तसेच रात्री बाहेर जाण्यामुळे वाटणारे भय कमी झाल्याचे सांगितले. या सर्वेक्षणात सामील महिलांनी तणावमुक्त आणि आत्मसन्मानाची भावना निर्माण झाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 फेब्रुवारी 2018 मध्ये लोकसभेत म्हटल्यानुसार, स्वच्छ भारत मिशनमुळे महिलांचा आत्मविश्वास दुणावला. त्यांच्या तणावमुक्तीचे कारणही हे अभियान ठरले आहे. स्वच्छ भारत मोहिमेने महिला सक्षमीकरणात मोलाची भूमिका बजावली. उघड्यावर शौचास जावे लागत असल्याने महिलांचे मानसिक खच्चीकरण व्हायचे. तसेच आत्मविश्वासही नसायचा. ही दोन्ही कारणे सशक्तीकरणातील मोठे अडथळे होते. पण आता स्वच्छतागृहाचा वापर होऊ लागल्याने आणि उघड्यावर शौचास जाण्याची नामुष्की संपुष्टात आल्याने महिलांच्या मनात आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने पाऊल टाकण्याची भावना तयार झाली. स्वच्छ भारत मोहिमेत महिला सक्षमीकरणात मोठे योगदान दिसले आहे. 2019-21 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2015 मध्ये एकुण आरोग्यावरचा खर्च 62.6 टक्क्यांवरून आर्थिक वर्ष 2020 मध्ये 47.01 टक्क्यांवर आला आहे. -डॉ. ऋतू सारस्वत, समाजशास्राच्या अभ्यासक
Check Also
तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय …