लेख-समिक्षण

सौंदर्यप्रसाधने वापरताय?

आजच्या युगात सुंदर दिसण्यासाठी स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. भारतातील सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ सुमारे 800 कोटी रुपयांहून अधिक आहे. पण यापैकी बहुतेक सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. यामुळे हार्मोनल सिस्टिममध्ये बिघाड, त्वचा संक्रमण यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय या कॉस्मेटिक उत्पादनांचा दीर्घकाळ वापर केल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे ही ब्युटी केअर प्रॉडक्ट्स वापरताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
• ब्युटी प्रॉडक्टस् सुगंधित करण्यासाठी आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी अनेक रसायने वापरली जातात. यामुळे त्वचेचे मोठे नुकसान होऊ शकते.
• जवळपास सर्वच महिला टाल्कम पावडरचा वापर करतात. पण यामध्ये मॅग्नेशियम आणि सिलिकेट मिसळले जाते. घामामध्ये सोडियम असल्याने सोडियम आणि मॅग्नेशियम मिळून घाम शोषून घेतात. याशिवाय काही टॅल्कम पावडरमध्ये अ‍ॅस्बेस्टोस आणि स्पास्टिक नावाचा पदार्थ असतो. यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
• नेलपॉलिशमध्ये टोल्युइन, फॉर्मल्डिहाइड आणि डायथिल फॅथलेट सारखी हानिकारक रसायने असतात. नेल पेंट रिमूव्हरमध्ये एसीटोन आढळते. हे सर्व पदार्थ त्वचेसाठी हानिकारक असतात. विविध प्रकारचे नेल पेंट वापरल्याने नखे कोरडी, लाल आणि कमकुवत होतात. याशिवाय आजकाल कृत्रिम नखांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. कृत्रिम नखे चिकटवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या गोंदामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो.
• हेअर रिमूव्हल क्रीमचा वापर त्वचेवरील नको असलेले केस काढण्यासाठी केला जातो. पण या क्रीममध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साइड सारखी रसायने असल्याने त्वचा जळू शकते किंवा काळी पडते. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांच्या त्वचेवर हेअर रिमूव्हल क्रीममुळे पुरळ उठू शकतात.
• अशाच प्रकारे हेअर डायमध्ये असणार्‍या रसायनाांमुळे त्वचेची जळजळ किंवा अ‍ॅलर्जी होऊ शकते.
• केसांच्या अनेक रंगांमध्ये अमोनिया, हायड्रोजन पेरॉक्साइड आणि पी-फेनिलेनेडायमिनसारखी रसायने मिसळली जातात. अमोनिया केसांच्या प्रथिनांचे थर वेगळे करतो. हायड्रोजन पेरोक्साईड केसांना ब्लीच करते आणि पी-फेनिलेनेडायमिन केस मऊ करण्याचे काम करते. पण या सर्वांमुळे डोळ्यांना अ‍ॅलर्जी होऊ शकते.

Check Also

फेसबुकवरुन व्यवहार करताना…

फेसबुकवरून आपण खरेदी विक्री देखील करू शकतो. परंतु आर्थिक व्यवहार करताना सुरक्षितता पाहणे अगोदरच गरजेचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *