लेख-समिक्षण

सुरुक्षित पदार्पण

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी 23 ऑक्टोबर रोजी केरळच्या वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रियांका या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या राजकारणात पडद्यामागे सक्रिय राहिल्या आहेत. 1990 च्या दशकाच्या शेवटच्या काळात त्यांनी आई सोनिया गांधी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. याशिवाय 2004 मध्ये अमेठीत राहुल गांधी उतरले तेव्हा प्रियांका गांधी यांनी त्यांच्यासाठी जोरदार जनसंपर्क अभियान राबविले. त्यांनी स्वत:ला पडद्यामागे राहणेच पसंत केले. राजकारणातील पहिली अधिकृत एंट्री 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर झाली होती. त्यावेळी त्यांना उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या प्रचाराच्या प्रभारी करण्यात आले होते. मात्र काँग्रेसला केवळ एकच जागा मिळाली. त्यानंतर 2022 मध्ये युपी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी खराब राहिली. तेव्हा त्यांच्या टीकाकारांनी प्रियांका गांधींच्या रुपातून काँग्रेसने चुकीचे ‘ट्रम्प कार्ड’ निवडले, अशा शब्दांत उपहास केला होता. आता सक्रिय सत्ताकारणात पदार्पण करताना वायनाडसारखा सुरक्षित मतदारसंघ निवडून काँग्रेसने त्यांची वाट सुकर केली आहे. त्यांच्या विजयानंतर काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी 23 ऑक्टोबर रोजी केरळच्या वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी रोड शो केला आणि यावेळी जनतेशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, “ मी गेल्या तीन दशकांपासून प्रचार करत आहे, मात्र यावेळी प्रथमच माझ्यासाठी मत मागत आहे.“
वायनाड लोकसभेची जागा त्यांचे बंधू आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे होती. त्यांनी लोकसभेच्या दोन जागांवरुन निवडणूक लढविली. वायनाड आणि रायबरेली. आता पक्षाने प्रियांका गांधी यांच्या निवडणुकीतील पदार्पणासाठी वायनाडची जागा निवडली. वायनाड येथे 13 नोव्हेंबरला मतदान होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. प्रियांका जर जिंकून आल्या तर गांधी कुटुंबातील तीन सदस्य संसद भवनात दिसतील. राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते असून सोनिया गांधी या राज्यसभेच्या सदस्य आहेत.
तीन दशकांपासून पडद्यामागून राजकीय नेतृत्व :प्रियांका गांधी या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या राजकारणात पडद्यामागे सक्रिय राहिल्या आहेत. 1990 च्या दशकाच्या शेवटच्या काळात त्यांनी आई सोनिया गांधी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. याशिवाय 2004 मध्ये अमेठीत राहुल गांधी उतरले तेव्हा प्रियांका गांधी यांनी त्यांच्यासाठी जोरदार जनसंपर्क अभियान राबविले. त्यांनी स्वत:ला पडद्यामागे राहणेच पसंत केले. राजकारणातील पहिली अधिकृत एंट्री 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर झाली होती. त्यावेळी त्यांना उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या प्रचाराच्या प्रभारी करण्यात आले होते. मात्र काँग्रेसला केवळ एकच जागा मिळाली. त्यानंतर 2022 मध्ये युपी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी खराब राहिली. तेव्हा त्यांच्या टीकाकारांनी प्रियांका गांधींच्या रुपातून काँग्रेसने चुकीचे ‘ट्रम्प कार्ड’ निवडले, अशा शब्दांत उपहास केला होता.
2019 मध्ये प्रियांका गांधी यांना काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून नेमण्यात आले तेव्हा त्या सोनिया गांधी यांचा पारंपरिक मतदारसंघ रायबरेलीची निवडणूक लढवतील, असे तर्क मांडण्यात आला. एवढेच नाही तर त्यांना निवडणुकीत उभे राहण्याबाबत आवाहन केले आणि तसे पोस्टरही झळकविण्यात आले. परंतु त्यांना मैदानात उतरवण्यात आले नाही. मग आता प्रश्न उपस्थित होतो आणि तो म्हणजे काँग्रेसने प्रियांका गांधी यांना निवडणुकीत उतरविण्याचा का निर्णय घेतला? प्रियांका गांधी या लोकसभेत दाखल होत असतील तर त्या बंधू राहुल गांधी यांच्यासमवेत मोदी सरकारला चांगल्या रितीने घेरू शकतात. वायनाडची निवडणूक ही त्यांच्यासाठी सोपी ठरू शकते. कारण तेथे राहुल गांधी लोकप्रिय आहेत. प्रियांका गांधी यांनी वायनाडच्या मतदारांना आवाहन करत सोशल मीडिया ‘एक्स’वर म्हटले, “मी 1989 मध्ये 17 वर्षाची असताना वडिलांसाठी पहिल्यांदा प्रचार केला. या घटनेला आता 35 वर्षेझाली आहेत. यादरम्यान आई, भाऊ आणि अनेक सहकार्‍यांसाठी वेगवेगळ्या निवडणुकांसाठी प्रचारसभा घेतल्या. मात्र आता मी पहिल्यांदाच माझ्यासाठी प्रचार करत आहे.मला युडीएफ आघाडीचा उमेदवार होण्याची संधी दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेयांचे मी मनापासून आभार मानते. वायनाडमधून पक्षाची उमेदवार होण्यासाठी कुटुंबांनी दिलेल्या पाठबळाबाबतही मी आभार मानते. तुम्ही मला प्रतिनिधी केले तर ती माझ्यासाठी सन्मानाची बाब असेल.”
इंदिरा गांधी यांच्याशी होते तुलना ः मतदारांचा एक वर्ग प्रियांका गांधी यांना झुकते माप देत आहे. लोकांना प्रियांका गांधी यांच्यात आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झलक दिसते. त्यांच्या मते, प्रियांका गांधी या इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच प्रबळ इच्छाशक्ती असणार्‍या महिला आहेत आणि त्यांना भारतीय राजकारणातील आव्हानांचा मुकाबला करण्याचे कौशल्य चांगल्या रितीने अवगत आहे. वास्तविक प्रियांका गांधी यांनाच राजीव गांधी यांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिले जात होते. एवढेच नाही तर राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर लोकांना आता प्रियांका गांधींच काँग्रेसच्या नव्या नेत्या हेातील, असे वाटत होते. परंतु त्यानंतर प्रियांका गांधी या राजकारणात उतरल्या नाहीत. वडिलांचा मृत्युनंतर प्रियांका गांधी या सार्वजनिकरित्या दिसल्या नाहीत. उद्योगपती रॉबर्ट वड्रा यांच्याशी विवाह झाल्यानंतरच प्रियांका गांधी या सावर्जनिकरित्या पहिल्यांदा दिसल्या.
1990च्या दशकातील शेवटच्या टप्प्यात काँग्रेस नेतृत्वावर आरोपांचा मारा केला जात होता आणि दुसरीकडे सोनिया गांधी यांनी राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला होता. अशा स्थितीत प्रियांका गांधी यांनीच पडद्यामागून पक्षाची स्थिती सांभाळली. आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांचा राजकारणातील मार्ग सुकर करण्यासाठी त्या मदत करू लागल्या. गेल्या काही वर्षांच्या काळात राहुल गांधी यांनी भारत जोडो यासारखे अनेक अभियान हाती घेतले. या अभियानात त्या राहुल गांधी यांच्यासमवेत खंबीरपणे असायच्या. 2019 ते 2024 या काळात प्रियांका गांधी या काँगे्रसमध्ये सक्रिय भूमिका घेत पुृढाकार घेत असल्याचे जनतेने पाहिले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. पक्षातून आणि समर्थकांकडून त्यांना निवडणुकीच्या राजकारणात आणण्याची मागणी होऊ लागली.
प्रियांका यांना घेरण्याचा प्रयत्न ः अर्थात अलिकडच्या काळात प्रियांका गांधींच्या कुटुंबावर आणि सदस्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तपास सस्थांनी पती रॉबर्ट वड्रा यांच्यावर आर्थिक गैरव्यंवहाराचे आणि कर चुकवेगिरीचे आरोप केले गेले. रॉबर्ट वड्रा यांच्या कंपनीने बेकायदा मार्गाने जमीन खरेदी केल्याचा आरोप झाला. मात्र वड्रा यांनी आरोप फेटाळून लावले. भ्रष्टाचाराचे आरोप गांधी कुटुंबाची प्रतिमा खराब करण्यासाठी केले जात असल्याचे काँग्रेस नेत्यांकडून सांगितले गेले.
– विश्वास सरदेशमुख, ज्येष्ठ प्रकार

Check Also

राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष

परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *