गायिका सुनिधी चौहानची तरुण वर्गात मोठी क्रेझ आहे. आपल्या सुंदर मधुर गाण्याने ती लाखो चाहत्यांना घायाळ करते. बॉलिवूडमधील टॉप गायिकांमध्ये सुनिधीच्या नावाचा समावेश केला जातो. तिने अनेक सिंगिंग रिअॅॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडली आहे. यानंतर आता तिने एका मुलाखतीत रिऍलिटीशोमागचं सत्य सांगितलं आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. याशिवाय सुनिधीने अनेक गायक ऑटोट्यून वापरत असल्याचं देखील सांगितलं.
सुनिधीने राज शामानी यांच्या पॉडकास्टमध्ये रिअॅलिटी शोबद्दल खुलेपणाने चर्चा केली. वास्तविक, गेल्या काही वर्षांपासून रिअॅलिटी शोजवर आरोप होत आहेत की अनेक शो हे स्क्रिप्टेड आहेत आणि त्यांचे विजेते आधीच ठरलेले असतात. आता स्वत: प्रसिद्ध सिंगिंग रिअॅलिटी शोची जज राहिलेली सुनिधी चौहान शोमध्ये होणार्या या आरोपांबद्दल उघडपणे बोलली आहे.
सुनिधी म्हणाली, ‘आताचे सिंगिंग रिअॅलिटी शो हे खोटे आहेत. काहीही खरं नाही. रिअॅलिटी शो आता खूप बदलले आहेत, पण पूर्वी असे नव्हते. सुरुवातीच्या दोन वर्षातील कार्यक्रम हे खरे होते जेव्हा मी इंडियन आयडॉलमध्ये जज होते. तेव्हा भावनिक नाटक केले जात नव्हतं. तुम्ही टीव्हीवर जे पाहत होतात ते खरं होतं. पण आता परिस्थिती बदलली. आता सगळं एडिट केलेलं असते.’
ती पुढे म्हणाली, ‘निर्माते प्रत्येक गायकाला सकारात्मक दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यातील एकाला अचानक दुसर्या दिवशी काढून टाकले जाते. त्यामुळे प्रेक्षकही गोंधळतात. पण हा सगळं प्लॅन असतो. या सगळ्या प्रकारांमुळे मी अशा कार्यक्रमात परीक्षक म्हणून जाणं बंद केलं. निर्माते तुम्हाला सांगतात कोणत्या स्पर्धकाविषयी चांगलं बोलायचं आणि कुणाविषयी नाही. भले तो चांगला गायला नाही तरी चालेल. कारण त्याच्यामुळे वाहिनीला फायदा होत असतो.’ सुनिधीने केलेल्या या खुलासानंतर पुन्हा एकदा रिअॅलिटी शोचे सत्य समोर आले आहे.- मानसी जोशी
Check Also
चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप
चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या …