लेख-समिक्षण

साचेबद्धपणा तोडा, छंद जोपासा

रोजच्या आयुष्यातील साचेबद्धपणामुळे कंटाळून जायला होतं. अशा वेळी धकाधकीच्या जीवनात मागे राहून गेलेला एखादा छंद जोपासायला काय हरकत आहे? स्क्रॅपबुकवर काम करणे असो, बागकामाचे कौशल्य जोपासायचे असो किंवा काही बदल करून घराची अंतर्गत सजावट करायची असो, शिवणकाम, विणकाम किंवा भरतकाम असो या सर्व छंदांकडे एकदा नजर टाका. वेळेचे व्यवस्थापन करा आणि या छंदांच्या दिशेने मार्गक्रमण करा. अगदी शिलाईचे उदाहरण घेतल्यास क्रॉस स्टिचिंग, आर्म विणकाम, लूम विणकाम आणि सुई पॉइंट असे बरेच प्रयोग करू शकता. यातून प्रियजनांसाठी चांगल्या, नवीन, वेगळया भेटवस्तू तयार करू शकता.
आजकाल तुम्ही यूट्यूबवर काहीही शिकू शकता. प्रत्येक गोष्टीची सविस्तर माहिती देणारे व्हिडीओ उपलब्ध आहेत. इकडेतिकडे निरर्थक गोष्टीत मौल्यवान वेळ वाया घालवून हाती काहीही लागणार नाही. त्यामुळे काहीतरी कल्पक करण्याचा प्रयत्न करा, त्याचा मानसिक आणि आर्थिक फायदा होईल. आजचे युग फ्युजनचे आहे, नवीन आणि जुन्या गोष्टी एकत्र करा आणि काहीही बनवा. शिवणकाम आणि भरतकामाचा छंद स्त्रियांसाठी खूप चांगला ठरू शकतो, कारण प्रत्येक स्त्रीमध्ये ही कला थोडीफार असतेच. फक्त ती चांगल्या प्रकारे जोपासून तिचा सदुपयोग करण्याची गरज असते. आधुनिकीकरणाने छंदाला ज्या प्रकारे प्रोत्साहन दिले आहे, त्यामुळे आता काम सुरू राहील की नाही याची चिंता राहिलेली नाही. टेलरींगच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी अनेक अभ्यासक्रम आहेत, ज्यांचे प्रशिक्षण शहरांपासून खेड्यांपर्यंत दिले जाते. त्या कोणत्याही प्रशिक्षकाकडून अभ्यासक्रम किंवा ऑनलाइन प्रशिक्षण घेता येईल. ही कला शिकण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज नाही, फक्त छंद, आवड हवी. शिवणकाम, भरतकाम हे फॅशन डिझायनिंग अंतर्गत येते.

Check Also

जग काय म्हणेल?

जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *