मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या सशक्त, दमदार आणि चतुरस्त्र अभिनया ने सुहास जोशी यांनी उमटवलेला ठसा अमीट आहे. भूमिकांच्या लांबी-रूंदीपेक्षा आशयाला महत्त्व देणार्या अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. हाती येईल ते काम उत्तम पद्धतीने करायचं हे तत्व अंगी भिनलेलं असल्यानं सुहास यांनी अगदी छोट्याशा भूमिकेतूनही स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं. ‘सातच्या आत घरात’मधली तरुणपिढीला मौलिक संदेश देणारी व्यक्तिरेखा असो किंवा ‘झिम्मा’मधली इंदू असो; त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणकुपीत सदैव राहिल्या. ऐंशी वर्षाच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांच्यातील अभिनयशैली जराही सुरकुतलेली नाही. उलट नव्यापिढीच्या बरोबरीने त्या वाटचाल करत आहेत.
– सोनम परब, सिनेअभ्यासक
मराठी सिनेनाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या सशक्त, दमदार आणि चतुरस्त्र अभिनयाने सुहास जोशी यांनी उमटवलेला ठसा अमीट आहे. भूमिकांच्या लांबी-रूंदीपेक्षा आशयाला महत्त्व देणार्या अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. हाती येईल ते काम उत्तम पद्धतीने करायचं हे तत्व अंगी भिनलेलं असल्यानं सुहास यांनी अगदी छोट्याशा भूमिकेतू नही स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं. ‘सातच्या आत घरात’मधली तरुणपिढीला मौलिक संदेश देणारी व्यक्ति रेखा असो किंवा ‘झिम्मा’ मधली इंदू असो; त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणकुपीत सदैव राहिल्या. ऐंशी वर्षाच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांच्यातील अभिनय शैली जराही सुरकुतलेली नाही. उलट नव्यापिढीच्या बरोबरीने त्या वाटचाल करत आहेत.
कला, क्रीडा, शिक्षण, अर्थ, विज्ञान, मनोरंजन आदी कोणत्याही क्षेत्रां मध्ये दिले जाणारे पुरस्कार हे एकीकडे स्वीकारणार्या व्यक्तीच्या कार्या ची दखल घेणारे असतात, तर दुसरी कडे त्याच्या पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणारे असतात. बदलत्या काळात पुरस्कारांची दुनिया ‘बहरलेली’ असली तरी काही पुरस्कारांचे मोल हे अनन्य साधारण असते. अलीकडेच ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झालेला विष्णुदास भावे पुरस्कार हा देखील असाच सन्मानजक मानला जातो. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीनं रंगभूमीची दीर्घकाळ सेवा करणार्या विष्णुदास कलाकाराला भावे गौरव पदकानं सन्मानित करण्यात येतं. नाट्य क्षेत्रात विशेष योगदान देणार्या कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार अतिशय मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जातो. त्यामुळं दरवर्षी पुरस्कार प्राप्त कलाकारांच्या नावाची घोषणा आणि रंगभूमी दिन कार्यक्रमांकडं सर्वांच्या नजरा असतात. यंदा हे या पुरस्काराचं 57 वं वर्ष आहे. येत्या पाच नोव्हेंबरला रंगभूमी दिनाच्या दिवशी सुहास जोशी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्या अभिनयाच्या प्रदीर्घ आणि भरीव कामगिरीबद्दल 2018 सालच्या संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.
सुहास जोशींची अभिनयाची कारकिर्द पाच दशकांची आहे. 1977 मध्ये गोवा हिंदू असोसिएशनने रंगभूमीवर आणलेल्या विजया मेहता यांच्या ‘बॅरीस्टर’ या बहुलोकप्रिय नाटकातून त्यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. खरे पाहता, विजयाताईंच्या नाटकामध्ये निवड होणे हेच त्याकाळात एखाद्या पुरस्कारासारखं होतं. त्यामुळं सुहास जोशी यांनी पदार्पणातूनच मुळी चौकार लगावला होता. नंतरच्या काळात ‘घरोघरी’, ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’, ‘नटसम्राट’, ‘कन्यादान’, ‘अग्निपंख’, ‘कथा’ अशा विविध नाटकांमधून त्यांच्या अभिनयाची छाप नाट्यरसिकांच्या मनावर उमटत गेली. त्यापूर्वी सई परांजपे यांच्या ‘पत्तेनगरी’ या बालनाट्यातून सुहास जोशी झळकल्या होत्या. त्याकाळात आकाशवाणी पुणे केंद्रावर होणार्या ‘बालोद्यान’मध्ये त्या भाग घेत असत.
सुहास जोशी या मूळच्या पुण्याच्या. विवाहानंतर त्या ठाणेकर झाल्या. तत्पूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण झाल्यानंतर दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयात अभिनयाचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी आपल्या गायनाच्या आवडीलाही प्रशिक्षणाचं कोंदण दिलं. लहान वयात संगीताचे धडे गिरवीत असताना गंधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद ही पदवीदेखील मिळविली. प्रसिद्ध संगीतकार केशवराव भोळे यांच्याकडे काही काळ त्या गाणे शिकण्यासाठी जात होत्या. महाविद्यालयीन जीवनात भालबा केळकरांच्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनतर्फे नाटकातून काम करू लागल्या. दिल्लीत एनएसडीमध्ये अभिनयाचे धड गिरवीत असताना सुहास जोशी यांनी नृत्य प्रशिक्षणही घेतले. कथकली, मणिपुरी, कथक, भरतनाट्यम हे सारे अभिजात नृत्यप्रकार आणि लोकनृत्यदेखील त्या शिकल्या. म्हणजेच अभिनय, गायन, नृत्य या तिन्ही कलांचा अभ्यास करुन त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला चतुरस्र बनवले. हाच चतुरस्रपणा त्यांच्या विविधांगी अभिनया मध्येही दिसून आला. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी पदार्पण केले तेव्हा सुरुवातीला सुहास हे नाव महिलेचे कसे, असा प्रश्न विचारला गेला होता. पण आपल्या अभिनयसामर्थ्याने त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.
एकच प्याला, ही श्रींची इच्छा, आनंदी गोपाळ, पंखांना ओढ पावलांची, गोष्ट जन्मांतरीची, स्मृतिचित्रे, मुलगी झाली हो, सातच्या आत घरात या वेगवेगळ्या विषयांवरील नाटक, बोलपट आणि चित्रपटांमधील सुहास जोशींचा अभिनयात हा त्यांचा वकूब विलक्षण असल्याचे दर्शवणारा आहे. दोन दशकांपूर्वी 2004 मध्ये आलेल्या ‘सातच्या आत घरात’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली मधुराची आजी आणि निरांजन लावतानाचे त्यांच्या तोंडचे संवाद अनेकांच्या स्मरणात राहिले. गंभीर अभिनयासोबत त्यांच्या विनोदी भूमिकाही गाजल्या.
गतवर्षी आलेल्या ‘झिम्मा’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली इंदू ही व्यक्तिरेखाही अफलातून होती. या चित्रपटासाठी वयाच्या 77व्या वर्षी अंडरवॉटर स्टंटचं प्रशिक्षण घेतलं होतं. पाण्यातल्या स्टंटसाठी श्वासावरचं नियंत्रण आवश्यक असतं. पण सुहासताईंनी याचा सराव केला आणि हा स्टंट करुन दाखवला. यावरुन त्यांच्या एव्हरग्रीनपणाची साक्ष मिळतेच, पण व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठीचा समर्पणभावही दिसून येतो. हाती येईल ते काम उत्तम पद्धतीने करायचं हे तत्व अंगी भिनलेलं असल्यानं सुहास यांनी अगदी छोट्याशा भूमिकेतूनही स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं.
दिलखुलास आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व असणार्या सुहास जोशी या स्पष्टपणा जपणार्या आहेत. भूमिकांच्या लांबी-रूंदीपेक्षा आशयातलं तिचं स्थान मला नेहमी महत्त्वाचं वाटतं, असं त्या सांगतात. मालिकांमध्ये होणारी विषयाची फरपट पटत नाही. विषय किती ताणायचे यालाही मर्यादा हव्यात, पण त्या पाळल्या जात नाहीत, असं मतही त्यांनी एका मुलाखतीत नोंदवलं होतं. आजवरच्या आपल्या कारकिर्दी बाबत त्या समाधानी आहेत. माणसानं आयुष्याला सामोरं जाताना त्याचं खरेपण जपावं, अनुभवसमृद्ध होत राहावं आणि आपल्या आवडीनुसार आपला प्रवास सुरू ठेवावा, या मताची मी असल्याचे त्या सांगतात. रंगभूमीवर सतत नवीन प्रयोग झाले पाहिजेत, असा त्यांचा ध्यास असतो. अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यातील त्यांचा सहभागही लक्षवेधी ठरला. नवोदित कलाकारांना मदत करण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असतात.
तरूण कलाकारांना काही नव्याने प्रयोग करून पाहायचे असल्यास त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्याचीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. ऐंशी वर्षाच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांच्यातील अभिनयशैली जराही सुरकुतलेली नाही. उलट नव्यापिढीच्या बरोबरीने नव्या टवटवीतपणाने त्या वाटचाल करत आहेत.
Check Also
लार्जर दॅन लाईफ
हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …