लेख-समिक्षण

सदाबहार एम्ब्रॉयडरी

आकर्षक एम्ब्रॉयडरी असलेले वेस्टर्न ड्रेसेसची फॅशन सध्या जोरात आहे. असे ड्रेस कोणत्याही समारंभात किंवा एरवीही परिधान करता येतात. फुलांचे वर्क असलेले शिफ्ट ड्रेस किंवा चिकन वर्क असलेली कॉटन ट्राऊजर आणि जरदोसी वर्क असलेला जंपसूट. अशा प्रकारच्या ड्रेसेसचा सध्या ट्रेंड आहे. अगदी सेलिब्रिटीजसुद्धा अशा प्रकारच्या ड्रेसेसना प्राधान्य देत आहेत.
एम्ब्रॉयडरी असलेले वेस्टर्न आऊटफीट्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीराचे आकर्षक वैशिष्ट्य आणखी आकर्षक करू शकता. म्हणजे तुमचे खांदे आकर्षक असतील तर शोल्डर एरियावर एम्ब्रॉयडरी असलेला ड्रेस तुम्ही घालू शकता.
सध्याच्या काळात वेस्टर्न आऊटफिट्समध्ये मोनोटोन, फ्लोरल आणि ज्योमेट्रीक पॅटर्नच्या एम्ब्रॉयडरीची चलती अधिक आहे. बोल्ड कँडी कलर्सचे काठ असलेले वेस्टर्न ड्रेसेसही खूप चालतात. याशिवाय गडद रंगांच्या ड्रेसेसमध्ये नियॉन रंगाचे थ्रेडवर्कही खूप छान दिसते.
कॉम्बीनेशन
एम्ब्रॉयडरी वेस्टर्न ड्रेसेसची निवड ही कार्यक्रमानुरूप केली पाहिजे. तुम्ही एखाद्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी जाणार असेल तर एम्ब्रॉयडर्ड ट्युनिकबरोबर ट्राऊजर परिधान केलेले चांगले. एखाद्या वाढदिवसाच्या पार्टीत जाणार असाल तर एम्ब्रॉयडरी शर्टवर फरूोई मॅक्सी छान दिसते. त्याचप्रमाणे मित्रमैत्रिणींबरोबर जाणार असाल तर थ्रेड वर्क असलेल्या कॅज्युअल टॉपवर लिनेन ट्राऊजर आणि रोमँटीक डेटवर जाणार असाल तर एम्वेलिश्ड मिनी स्कर्टवर फिटेड टॉप छान दिसतो.
पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की प्रत्येक ठिकाणी एम्ब्रॉयडरी असलेला ड्रेस चांगला दिसत नाही. ऑफीसला जाताना डल शेडचा सीक्वेन्स किंवा थ्रेड वर्क चांगला दिसतो. तर पार्टीवेअर ड्रेसेससाठी भडक रंगाच्या दोर्‍यांचे आणि चमकणार्‍या खड्यांचे वर्क उठून दिसते.

Check Also

जग काय म्हणेल?

जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *