लेख-समिक्षण

व्होट जिहाद संज्ञेची चौकशी होणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवारी दुपारी केली. महाराष्ट्रात एका टप्प्यात म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी पाड पडेल.झारखंडमध्ये दोन टप्प्यात म्हणजेच 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. यानंतर बुधवारी राज्य निवडणूक मुख्य अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत व्होट जिहाद संज्ञेचे चौकशी करण्याचा इशारा दिला. राज्यातील 288 तर झारखंडमधील 81 जागांसाठी निवडणुका जाहीर करण्यात आला. या घोषणेसह दोन्ही राज्यात आचारसंहिता लागू झाली.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार व निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांनी मंगळवारी विधानसभा 2024च्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयोगाला 26 नोव्हेंबर 2024 पूर्वी निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्यापूर्वी म्हणजेच 20 नोव्हेंबरला मतदान पर पडेल. तर 23 नोव्हेंबरला मराहाष्ट्रातील जनता महायुतीला निवडते की महाविकास आघाडीला याचा निकाल लागेल. निवडणुका या येत्या महिना भरात पार पडणार असल्याने राजकीय पक्षांकडे प्रचारासाठी खूप वेळ शिल्लक आहे. 18 नोव्हेंबरला प्रचार तोफा थंडावतील. झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे, सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणूक निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंनी शिवसेना मिळवली, तर अजित पवारांनी राष्ट्रवादी आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांना जनता किती साथ देते पाहावं लागेल. तर, दुसरीकडे, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची जादू लोकसभेप्रमाणे पुन्हा कमाल करणार का, याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेले आहे.
राज्यात महायुती सरकारने आठवडाभरापासून शासन निर्णयांचा धडाका लावला होता. अगदी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली, त्या दिवशी मंगळवारीही ही निर्णयांची मालिका कायम राहिली. दिवसभरात जाहीर झालेल्या 200हून अधिक शासन निर्णयांपैकी अनेक निर्णय आचारसंहिता लागू झाल्यावर प्रसिद्ध झाले. याची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत चौकशी केली जाईल, असे आयोगाने बुधवारी राज्य निवडणूक मुख्य अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीची सविस्तर माहितीही देण्यात आली. ‘राज्यात आचारसंहिता लागू झाल्यावर राज्य सरकारतफर्फे दिवसभर शासन निर्णय जारी करण्यात आले. यामध्ये आमदारांच्या निधीवाटपासह इतरही अनेक प्रशासकीय मान्यतेबाबतच्या अध्यादेशांचा समावेश असल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. त्यामुळे दुपारी 3.30 वाजल्यानंतर कोणते शासन निर्णय जाहीर झाले, हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे का, हे तपासून पाहिले जाईल,’ असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच महायुतीच्या अनेक नेत्यांकडून ‘व्होट जिहाद’ हा शब्द सर्रास वापरला जातो. हा धार्मिक प्रचाराचा भाग असल्याचे बोलले जाते. मात्र आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर हा शब्द वापरण्यात आला आहे का, हे तपासून त्यानंतरच यापुढील कार्यवाही केली जाईल, असेही एस.चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता मंगळवारी जाहीर झाल्यानंतरही राज्य सरकारकडून बुधवारी अनेक शासन निर्णय जारी करण्यात आले. यावर निवडणूक आयोगाने राज्य सरकारला विचारणा करताच सर्व शासन निर्णय वेबसाइटवरून हटवण्यात आल्याचे समजते. वर्तमानपत्रातही निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यावरही आयोग कारवाईचा बडगा उचलणार असल्याचे समजते.
राज्यातील सर्व मतदारांनी मतदार यादीतील आपले नाव तपासून घेण्याचे आवाहन एस. चोक्कलिंगम यांनी केले. ज्या पात्र नागरिकांची अद्याप मतदार नोंदणी झालेली नाही, त्यांना त्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे, असे जाहीर करण्यात आले. लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक मतदार केंद्रांवर झालेला गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत याबाबत खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्याची सूचना संबंधितांना करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाशयोजना, दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हीलचेअर यांसारख्या व्यवस्था पुरविण्यात येणार आहेत.

Check Also

तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *