आध्र प्रदेशाचे वैशिष्ट्य असणारी स्टायलिश, ट्रेंडी तितकीच साधी आणि सुंदर दिसणारी व्यंकटगिरी साडी आपले वेगळेपण राखून आहे. वजनाला हलक्या, मुलायम असणार्या या साड्या महिला वर्गात वेगळा ठसा उमटवून आहेत. या साड्यांमध्ये भरपूर वैविध्य असून त्या प्रामुख्याने कॉटन आणि सिल्कच्या धाग्यांपासून हातमागावर विणल्या जातात.
या साड्या आंध्र प्रदेशातील नेल्लोरे जिल्ह्यातील व्यंकटगिरी या छोट्याशा गावात विणल्या जातात म्हणून, या गावाच्याच नावाने या साड्या ओळखल्या जातात.
या हँडलूमवर विणलेल्या साडांचा अलीकडचा लूक खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. कॉटनमध्ये विणलेल्या असल्या तरी त्या वजनला हलक्या असतात आणि डोळ्यांना सुखावणार्या असतात. या साड्यांमधील नक्षीकामांमध्ये डॉट्स, पाने, पोपट आणि साधे भौमितीक आकार विणलेले दिसतात. यासाठी वापरण्यात येणारा धागा हा अतिशय बारिक पॉलिश केलेला आणि पक्का असतो.
पारंपरिक पद्धतीने जी व्यंकटगिरी साडी विणली जाते, ती सुती धाग्यापासून विणली जाते. पण काळानुसार सिल्कचे धागेसुद्धा यासाठी वापरण्यात येऊ लागले आहेत. यामध्ये ‘व्यंकटगिरी जरी कॉटन हॅँडलूम साडी’ विशेष प्रसिद्ध आहे. जुन्या काळातील राजे-रजवाड्यांच्या काळापासून याचा इतिहास सापडतो. पूर्वी राण्यांना आवडतील अशा प्रकारच्या साड्या विणकर मुद्दाम विणून देत असत. त्याच्या मोबदला म्हणून त्यांना भरपूर बिदागीसुद्धा दिली जात असे.
तिच्या विशिष्ट प्रकारच्या विणकामामुळे ही साडी जास्त लोकप्रिय आहे.
इतर साड्यांच्या डिझाईनच्या बाबतीत या साडीवरचे डिझाईन फारच वेगळे असते.
यामध्ये बांगलादेशमधील ‘जिंदानी’ डिझाईन सुधारीत करून अलीकडे वापरली जाते. त्यामुळे ही साडी आणखीनच वेगळी ठरते. हा साडी विणणार्या लूम्सला ‘पिट लूम्स’ असे म्हणतात.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …