लेख-समिक्षण

वितंडवादी घराची, सवंग लोकप्रियता

प्रेक्षकांची अभिरुची जसजशी बदलत आहे, तसतसा मनोरंजनाच्या क्षेत्रातील कार्यक्रमांचा दर्जाही ढासळत आहे. 1980 च्या दशकांत दूरचित्रवाणीवर हमलोग, नुक्कड, देख भाई देख, रामायण, महाभारत यासारख्या दर्जेदार मालिकांनी भारतीय समाज मनावर सखोल आणि सकारात्मक परिणाम केला होता. ंयाउलट आताच्या बहुतांश मालिका द्वेषावर किंवा अश्लिलतेचा कळस गाठणार्‍या आहेत. गेल्या दीड दोन दशकांपासून बिग बॉसने भारतीय दूरचित्रवाणीवर बस्तान मांडले आहे. लोकांच्या घरातील भांडणे टिव्हीवर पाहण्याची संधी या मालिकेने लोकांना करून दिली आहे. आपल्याला दुसर्‍याच्या घरातील भांडणे ऐकण्याचा आणि पाहण्यात ‘इंटरेस्ट‘ असतो. याच मानसिकतेचा फायदा घेत वलयांकित मंडळी येथे आपल्या तथाकथित कलागुणांचे सादरीकरण या मालिकेत करत असतात.
——-
प्रेक्षकांची अभिरुची जसजशी बदलत आहे, तसतसा मनोरंजनाच्या क्षेत्रातील कार्यक्रमांचा दर्जाही ढासळत आहे. 1980 च्या दशकांत दूरचित्रवाणीवर हमलोग, नुक्कड, देख भाई देख, रामायण, महाभारत यासारख्या दर्जेदार मालिकांनी भारतीय समाज मनावर सखोल आणि सकारात्मक परिणाम केला होता. ंयाउलट आताच्या बहुतांश मालिका द्वेषावर किंवा अश्लिलतेचा कळस गाठणार्‍या आहेत. गेल्या दीड दोन दशकांपासून बिग बॉसने भारतीय दूरचित्रवाणीवर बस्तान मांडले आहे. लोकांच्या घरातील भांडणे टिव्हीवर पाहण्याची संधी या मालिकेने लोकांना करून दिली आहे. आपल्याला दुसर्‍याच्या घरातील भांडणे ऐकण्याचा आणि पाहण्यात ‘इंटरेस्ट‘ असतो. याच मानसिकतेचा फायदा घेत कलाविश्वातील टाकाऊ कलाकार आपल्या तथाकथित कलागुणांचे सादरीकरण या मालिकेत करत असतात. सवंग लोकप्रियता मिळवण्याच्या नावाखाली नित्तीमत्तेचे भान राखले जात नाही, हे दुर्देव.
काही काळापूर्वी बिग बॉसची लोकप्रियता एवढी होती की मलाही ते पाहण्याचा मोह आवरता आला नाही. त्याचे एक दोन भाग दोन चार मिनिटांसाठी पाहिले आणि डोकं सुन्न झाले. प्रारंभी या फसव्या जगात राहणार्‍या लोकांच्या खर्‍या आयुष्याचे प्रतिबिंब दिसेल, असे वाटले होते. पण मनातील संभ्रम दूर झाला. तद्दन फालतू आणि त्याला पाहणारे लोक देखील अतिशय सुमार विचार करणारे असून एकंदरीत त्यांच्याकडे विचार करण्यासारखे काही राहिलेले नाही का? असे वाटू लागते. ही मालिका एवढी निकृष्ट वाटली की ती दोन मिनिटेही सहन झाली नाही. या मालिकेत दाखविला जाणारा गलिच्छपणा हा कोणत्याही सामान्य माणसासाठी असू शकत नाही. प्रेक्षकांसाठी तो तर एखाद्या ‘ट्रॉमा’पेक्षा कमी नव्हता. तरीही एक गोष्ट अस्वस्थ करते आणि ती म्हणजे आजही हा शो प्रचंड लोकप्रिय आहे. साहजिकच असंख्य लोक ते पाहत असतील. परंतु मला प्रेक्षकांना विचायरायचे की तुम्ही या मालिकेत काय पाहता?
यात सर्वकाही स्क्रीप्टेड म्हणजे ठरलेले असते आणि ठरवून दिलेले असते. कोण कधी काय बोलणार, कोण कोणाला भिडणार, शिवीगाळ, धटिंगपणा, मस्ती, अश्लितता हे सर्व नियोजनबद्ध असते. यातील स्पर्धक एकमेकांवर तुटून पडतात, काही वेळा तर मारही लागतो. मुलगा काय, मुलगी काय ते सर्वच्या सर्व एकमेकांना मागे खेचण्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत घसरण्यास आतूर असतात. यात सर्व गोष्टींची पातळी सुटलेली असते. वास्तविक हा शो एका मोठ्या घरात होतो आणि तेथील स्पर्धक सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी आतूर झालेले असतात. यातील स्पर्धक किंवा खेळाडू पाहिले तर ते आताच मनोरुग्णालयातून सुटून इथे तर आला नाही ना? अशी शंका वाटू लागते.
बिग बॉसमध्ये राहण्यासाठी एवढे आचरट चाळे करावे लागतात की ते पाहून सामान्य व्यक्ती देखील आश्चर्यचकीत हेातो. यातील स्पर्धक एवढा आरडाओरड करतात, की जणू त्यांच्या शेपटीवर कोणीतरी पाय दिलाय. एक दिवस माझ्या मोबाईलवर अचानक एक क्लिप आली. त्यात स्पर्धक दुसर्‍याला विचारतो की, क्या चल रहा है, आप की लाइफ मे. दुसरा स्पर्धक म्हणतो, सर्वकाही ठिक असते तर मी कशाला बिग बॉसमध्ये दिसलो असतो. याचाच अर्थ स्पर्धक सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी बिग बॉसमध्ये जाणे पसंत करतात. मला आश्चर्य वाटते की, सामान्य बुद्धिचा माणूस ही मालिका कशी पाहू शकतो? बिग बॉससारख्या फालतू शो पाहणार्‍यांना एकप्रकारे स्वस्तात नशा दिली जात आहे. आज जे या कार्यक्रमांचे प्रेक्षक आहेत, त्यांच्यावर खरच उपचाराची गरज आहे.
कदाचित सर्वकाही ठरल्याप्रमाणे घडत असते. यातील सहभागी स्पर्धक वैयक्तिक जीवनातील काही प्रसंग शेअर करतात. अर्थात या गोष्टी सोप्या नाहीत. पण बहुतांश स्पर्धक लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि ‘टीआरपी’साठी बोलतात. परंतु त्यानंतर त्यांच्या खासगी आयुंष्यावर परिणाम होतो. समाज, कुटुंबांच्या टीकेला सामोरे जावे लागते. यापूर्वी अनेक स्पर्धकांना मानसिक आजारांना सामोरे जावे लागले आहे. मग ‘बिग बॉस’ याचा विचार करतो का? त्याचे थेट उत्तर अजिबात नाही, असेच आहे. बिग बॉस देखील असेच म्हणतो, की समाजाला जे आवडते, ते आम्ही दाखवतो. अशावेळी एक विचार येतो की प्रत्यक्षातही अनेक लोक असेही असतात की ते अनैतिक वर्तनातून, असभ्येतून आणि अतार्किक वागण्यातून लोकांचे लक्ष वेधून घेतात? त्याचवेळी सभ्य गोष्टी या चिल्लर वाटू लागतात. आपला समाज एवढा नादीस्ट आहे की, धिंगामस्तीशिवाय आयुष्य निरस वाटू लागते. या कारणामुळेच बिग बॉसची लोकप्रियता आज शिखरावर आहे आणि ती आपल्या समाजाचे वास्तव सांगण्याचे काम करत आहे.
बिग बॉसच्या मते, समाजावर परिणाम करणारेच यात सहमागी होतात. पण हे ऐकून हसू आल्यशिवाय राहत नाही. बिगबॉसमध्ये मला असा एकही व्यक्ती दिसला नाही की त्याचा समाजावर सकारात्मक परिणाम झालेला आहे. याचाच अर्थ बिगबॉसध्ये प्रवेश करायचा असेल तर प्रसिद्ध असणे गरजेचे आहे. मग तो कोणत्याही मार्गाने प्रसिद्धी मिळवणारा असो. बिग बॉसमध्ये आजपर्यंत असा एकही स्पर्धक दिसला नाही की त्याने जागतिक पातळीवर भारताचे नाव गाजवले आहे. काही अपवाद असू शकतात आणि त्याबाबत सांगता येणार नाही. अशा स्थितीत भजनसम्राट अनुप जलोटा एकदा आपल्या शिष्यासमवेत बिग बॉसमध्ये गेले. तेथे ती शिष्या अनुप जलोटा यांची प्रेमिका असल्याचे दाखविले गेले. अनुप जलोटा यांचे नाव भजन विश्वात आदराने घेतले जाते आणि ते एक व्यक्ती म्हणून तितकेच नम्र आहे. परंतु ते बिग बॉसमध्ये गेल्याने त्यांची प्रतिमा ढासळली. अत्युच्च कामगिरी करणार्‍या व्यक्तीला किंवा वलय निर्माण करणार्‍या व्यक्तीला तत्कालिन काळात माध्यम, मासिकात मुख्य स्थानी ठेवले जाते. परंतु त्यानंतर त्याची जागा अन्य कोणीतरी घेतो तेव्हा तो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो. हेच तर बिग बॉसला हवे की तुम्ही चर्चेत राहा. वास्तविक आजच्या काळात टिव्ही हा समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे. मालिका, चित्रपट, बातम्या, संगीत आदी गोष्टी असंवेदनशील, हिंसात्मक , प्रक्षोभक दिसतात. जाणीवपूर्वक या गोष्टी समाजासमोर आणल्या जात असल्याचे वाटते. जेणेकरून भारतीय नागरिकांची विचारशक्ती खुंटली जावी. त्यामुळे मुलभूत मुद्द्यावर विचार करण्यासाठी आवश्यक तो वैचारिक खाद्य पुरवठा समाजाला होत नाही. म्हणून या विषयावर समाजाच्या अग्रभागी राहणार्‍या लोकांनी विचार करायला हवा.
आपण सर्वांनी विचार करावा की आपण काय पाहतोय? आणि का पाहत आहोत? आपल्यां आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो. वास्तविक अशा प्रकारच्या कार्यक्रमातून त्याचा परिणाम अधिक राहतो. शेवटी चांगल्या कंटेटसाठी वेळ खर्च करायला हवा. आजघडीला आपल्या देशात एवढी बेरोजगारी आहे की रिकामे लोग काहीही करत वेळ गमावताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’ तर पालकही मुलांसमवेत बसून आवडीने पाहत असतात. बाजाराचे आपले धोरण असते, विचार असतो. त्याला ठाऊक असते की काय विकायचे आहे. सर्वाना स्वातंत्र्य असते, काहीही पाहण्याचे. पण पाहणार्‍यांनी एकदा तरी आत्मपरिक्षण करायला हवे की आपण ‘बिग बॉस’ का पाहतोय?- दिलीपकुमार पाठक

Check Also

लार्जर दॅन लाईफ

हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *