विविध प्रकारच्या भाज्या, वरण, आमटी, पोहे, उपमा यांना कढीपत्त्यामुळे एक वेगळाच स्वाद येतो. इडली-डोशांसाठीच्या खोबर्याच्या चटणीवरही कढीपत्त्याची फोडणी घातल्यास उत्तम चव येते. लोह, ‘क’आणि ‘अ’ जीवनसत्त्व, तसेच आयोडिनचे भरपूर प्रमाण असलेला कढीपत्ता हे स्वयंपाकघरातील एक महाऔषध आहे, असे म्हणता येईल. कढीपत्त्याच्या वापराने पचनसंस्था सुधारता येते. तसेच रुक्ष, गळणार्या केसांसाठी हे संजीवनी ठरू शकते. गरजेपेक्षा जास्त केमिकल्सचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचं नुकसान होतं. कढीपत्त्यात केसांना निरोगी ठेवणारी तत्त्वे आहेत. यासाठी पानांचा बारीक लेप बनवावा. मग तो लेप केसांच्या मुळाशी लावावा. कढीपत्त्याची पाने खाल्ल्याने केस काळे, लांब आणि घनदाट होतात. कोंड्याची समस्याही दूर होते.
अनेक जणी घरातील वाळलेला कढीपत्ता टाकून देतात. पण या कढीपत्त्याच्या पानांची पूड करून ती खोबरेल तेलात उकळून घ्यावी. तेल थंड झाल्यावर ते गाळून हवाबंद बाटलीत भरून ठेवावं. झोपण्यापूर्वी हे तेल लावून दुसर्या दिवशी नैसर्गिक शांपूने केस धुवावेत. केसांची वाढ होते आणि रुक्षपणा निघून जातो. या कढीपत्त्याची पानं बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …