फॅशनमध्ये नित्यनवीन गोष्टी येत असतात. तरूणींच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये तर सारखंच काहीतरी नवीन येत असतं. त्यांच्या अॅक्सेसरीजमध्ये सध्या बटव्याची फॅशन फारच जोरात आहे. कोणत्याही पोशाखाबरोबर बटवा सहज अॅक्सेप्ट केला जातोय. बटव्याला पर्सची उपयुक्तता आणि फॅशनची शान अशा दोन्ही गोष्टी असल्याने त्याची महती फारच वाढली आहे.
* बटवे कॅरी करायला फारच सोपे आहेत. ते साडी, चुडीदार वगैरे वर तर उठून दिसतातच पण आता ते मॉडर्न पेहरावाबरोबरही आपलं स्थान पक्कं करू पाहत आहेत. त्यात गोटा वर्क, काचेचं नक्षीकाम, भरतकाम किंवा मणी- माळा यांची सजावटही खूपच लोकप्रिय होत आहे.
* साध्या कच्छीकामापासून ते हेवी राजस्थानी जरीकामापर्यंत त्यात अनेक प्रकार आहेत. शिवाय त्याला एथनिक बनवायचं असेल तर त्यावर मोती, स्टोन यांचंही काम केलं जाऊ लागलं आहे.
* बटवा तुम्हाला फॅशन स्टेटमेंट म्हणून वापरायचा असेल तर बटबा खरेदी करताना काही गोष्टी आवर्जून पहाव्यात. बटव्याचा आकार तुम्हच्या ड्रेसला सूटेबल निवडा. फार मोठा बटवा शोभून दिसणार नाही तसेच तो वागवायलाही अवघड होईल. त्याचप्रमाणे फक्त मोबाईल किंवा वॉलेट बसेल एवढा लहान बटवाही त्याच्या लहान आकाराने विसंगत वाटू शकतो. त्यामुळे हातात धरता येईल असा मध्यम आकाराचा बटवा निवडावा. त्यावर आरशांचे काम असेल तर त्याची नीट पाहाणी करावी कारण ते निखळले तर त्याची शोभा निघून जाईल. बटव्याची दोरी खूप नाजूक असेल तर ती कधीही तुटू शकते. त्याची ताकद तपासून घ्यावी. चेन किंवा बटणे नीट पाहून घेणे श्रेयस्कर असते.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …