अभिनेत्री राणी मुखर्जीचा ’मर्दानी’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाच्या सिक्वेलनंतर तिसर्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. यशराज फिल्मसची निर्मिती असलेल्या ’मर्दानी’ चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका होती.
या चित्रपटात तिने आयपीएस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय ही भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या डॅशिंग पोलीस अधिकार्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी दाद दिली होती.
‘मर्दानी’ चित्रपट हा यशराज फिल्मसची स्त्री-प्रधान चित्रपटाची फ्रेंचायझी आहे. ‘मर्दानी’ चा पहिला भाग 2014 मध्ये प्रदर्शित झाला आणि 2019 मध्ये या चित्रपटाचा सिक्वल आला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या तिसर्या भागाची घोषणा करण्यात आली असली तरी चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.- जान्हवी शिरोडकर
Check Also
लार्जर दॅन लाईफ
हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …