लेख-समिक्षण

रसगुल्ले आरोग्यदायी?

लोकांची जेवण गोडाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे अर्थातच तिकडे अनेक प्रकारच्या मिठाया पाहायला मिळतात. मिष्टी दोही (बासुंदीचे दही!) असो किंवा रसगुल्ले, हे पदार्थ आता देशभरात आवडीने खाल्ले जातात. मधुमेह असलेल्या लोकांचा अपवाद सोडला तर हे रसगुल्लेही अनेक कारणांसाठी हितकारक ठरू शकतात. याबाबतची आहारतज्ज्ञांनी दिलेली ही माहिती…
जर तुम्हाला मधुमेह नसेल तर तुम्ही दिवसातून दोन ते तीन रसगुल्ले खाऊ शकता, याचा तुमच्या आरोग्याला नक्की फायदा होईल, असे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे. 100 ग्रॅम रसगुल्ल्यामध्ये 153 कॅलरीज कार्बोहायड्रेटस्, 17 कॅलरीज फॅट आणि 16 कॅलरीज प्रोटिन असतात. रसगुल्ल्यामध्ये भरपूर प्रमाणात लॅक्टोअ‍ॅसिड आणि केसिन असते. ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो. रसगुल्ल्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम देखील असते, ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते. रसगुल्ला खाण्यामुळे डोळ्यांसंबंधित आजारही दूर होतात. रसगुल्ला खाल्ल्यामुळे डोळ्यांची जळजळ दूर होते आणि पिवळेपणाही दूर होतो.कमी कॅलरीज असलेल्या मिठाईमध्ये रसगुल्ल्याचा समावेश होतो. रसगुल्ला रिकाम्या पोटीही खाऊ शकतो. काविळीच्या रुग्णांनी रोज सकाळी रसगुल्ला खाल्ल्यास त्यांना आराम मिळतो. रिकाम्या पोटी रसगुल्ला खाल्ल्याने यकृताला आराम मिळतो.
जळजळपासून आरामरसगुल्ला खाल्ल्याने लघवी करताना जळजळ होण्यापासून आराम मिळतो. रसगुल्ल्याचे सेवन केल्यामुळे स्नायूंची ताकद टिकून राहण्यास मदत होते; पण मधुमेही रुग्णांनी रसगुल्ल्याचे सेवन करू नये.
गरोदरपणात प्रभावीरसगुल्ला खाणं गरोदरपणात प्रभावी ठरू शकतं. पण गर्भवती महिलांनी दररोज दोनपेक्षा जास्त रसगुल्ले खाऊ नयेत. यामुळे त्यांना मधुमेह होण्याची शक्यता असतो. त्याशिवाय रसगुल्ला खाताना तो पूर्ण पिळून त्यातील पाक काढूनच खावा.

Check Also

प्रेरणादायी संघर्षगाथा

कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *