‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाणला मोठी लोकप्रियता मिळाली. काही महिन्यांपूर्वीच योगिताने मालिकेतील तिचा सहकलाकार सौरभ चौघुले याच्याशीच तिने खर्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली. यानंतर सध्या योगिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र बिग बॉसमध्ये वापरल्या जाणार्या घाणेरड्या भाषेवरून योगिताच्या पतीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.
सौरभने त्याच्या या पोस्टमध्ये बिग बॉसमधील काही स्पर्धकांच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. ‘लायकी, भीक आणि घाणेरडी भाषा वापरली जाते. खरंच हा कुटुंबासोबत बघता येणारा प्रोग्राम आहे का?’, असा सवाल त्याने केला आहे.
दरम्यान, नुकताच बिग बॉसच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सीसाठी टास्क रंगला. यावेळी योगिताने उत्तम खेळ खेळला. शेवटच्या टप्प्यात तिच्याकडे कॅप्टन निवडण्याची पॉवर होती तेव्हा तिने अंकिता निवडले. त्यामुळे अंकिता प्रभू वालावलकर या सीझनची पहिली कॅप्टन झाली. तसंच सध्या घरात दोन ग्रुप पडले आहेत. निक्की तांबोळी, अरबाज, जान्हवी, पुढारी घन:श्याम, वैभव चव्हाण यांचा एक ग्रुप आहे. तर इतर सर्व दुसर्या ग्रुपमध्ये आहेत.
दरम्यान, ‘जीव माझा गुंतला’ मालिकेत योगिता आणि सौरभ मुख्य भूमिकेत होते. रील लाईफमधली ही जोडी रिअल लाईफमध्येही प्रेमात पडली. त्यांच्या लग्नानंतर चाहते खूश झाले होते. सध्या योगिता बिग बॉसमध्ये असून समीर तिला बाहेरुन सपोर्ट करताना दिसत आहे. यातच आता त्याने बिग बॉसच्या घरात वापरल्या जाणार्या शब्दांवर संताप व्यक्त केला आहे.- मानसी जोशी
Check Also
चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप
चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या …