वैयक्तिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक अशा तिन्ही पातळ्यांवर सुयोग्य आणि प्रभावी संवादाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महिलांचा विचार करता आपल्यापैकी अनेक जणी केवळ नाहक बडबडीमुळे ओळखल्या जातात; तर काही जणी उत्कृष्ट संवादकौशल्याने आपला प्रभाव पाडून जातात. संवाद कौशल्याने अधिकाधिक माणस जोडली जातात. हे कौशल्य अंगी कसं बाणवायचं याविषयीचं मार्गदर्शन.
* नेहमी दुसर्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका.
* आपल्या भावनानंत नियंत्रण ठेवायला शिका.
* तुमच्या भावना योग्य शब्दांत आणि योग्यप्रकारे मांडायला शिका.
* दुसर्यांच्या दृष्टिकोनातून विचार करायला शिका.
* इतरांकडेे दुर्लक्ष करू नका.
* दुसर्यांना प्रतिसाद द्या.
* प्रत्येक वेळेस तुम्ही दुसर्यांबरोबर सहमत असालच असं नाही; पण म्हणून वाद घालू नका. तुमची बाजू शांतपणे समजावून सांगा.
* अपमानकारक शब्द, शिव्या यांचा वापर टाळा.
* तुमच्या बोलण्यात माधुर्य असू द्या.
* विनाकारण, फालतू बडबड टाळा.
* समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन त्याप्रमाणे तुमच्या वागण्या-बोलण्यास बदल करा.
* इतरांना आदर द्या.
* छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …