लेख-समिक्षण

ब्लॅकहेड्सवर लावा घरगुती फेसपॅक

कोथिंबीर पॅक
ताज्या कोथिंबिरीची पाने घ्या आणि ती व्यवस्थित धुवा. त्यात थोडी हळद आणि पाणी घालून कोथिंबीरची पेस्ट करा. हा मास्क ब्लॅकहेड्सवर लावा आणि रात्रभर ठेवा. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही आठवड्यातून दोनदा हे करू शकता.
अंड्याचा पांढरा भाग
एक अंडे घ्या. अंड्याचा पांढरा भाग घेऊन, त्यात एक चमचा लिंबूचा रस टाका. हे मिशण ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ब्लॅकहेड्सच्या ठिकाणी हे मिशण ब्रशने लावा आणि कोरडे पडल्यानंतर थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा तुम्ही हा उपाय करू शकता.
दही फेस मास्क
या ब्लॅकहेड मास्कसाठी तीन चमचे ओट्सचे पीठ, दोन चमचे दही, एक चमचा ऑलिव्ह ऑईल व एक चमचा लिंबाचा रस एकत्र करा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट ब्लॅकहेड्सवर लावा आणि कोरडी झाल्यानंतर थंड पाण्याने धुवा.
हळद आणि चंदन पॅक
अर्धा चमचा हळद पावडर, एक चमचा चंदन पावडर आणि त्यात थोडे दही मिसळून पेस्ट बनवा. ब्लॅकहेड्सवर ही पेस्ट लावा आणि 20 मिनिटे ठेवा. त्यानंतर थोडे स्क्रब करा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय तुम्ही 15 दिवसांतून एकदा करू शकता.
हा उपाय करण्याच्या दोन मिनिटांपूर्वी कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि सॉफ्ट टॉवेलने पुसा. त्यामुळे ब्लॅकहेड्स अधिक सौम्य होऊन, ते घालवणे सोपे जाईल. तैलसर मेकअप कधीही करू नका आणि नेहमी सनस्क्रीन वापरा.

Check Also

जग काय म्हणेल?

जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *