आजकाल युवकांमध्ये सेल्फी घेण्याची आणि त्याला सोशल मिडियावर पोस्ट करण्याची क्रेझ वाढली आहे. फोटो चांगला आला असेल तर मित्रांचे ‘लाइक’ आणि ‘कॉमेंट’ मिळण्याची शक्यता अधिक असते. जर आपण आपल्या स्मार्टफोनने फोटो काढला असेल आणि त्या फोटोने समाधानी नसताल तर काळजी करू नका. काही खास अॅप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या फोटोला चांगला लूक देऊ शकतो. अलीकडेच गुगलने अशा प्रकारचा अॅप सादर केला आहे की, जो फोन कॅमेरा हालला तरीही फोटो धुरकट होणार नाही. यासंदर्भातील काही अॅप्सची माहिती घेऊ या.
गूगलचे मोशन स्टिल अॅप : हा अॅप आपल्या फोटोमध्ये जीवंतपणा आणू शकतो. फोटो काढताना कधी कधी आपला हात हलतो. अशा वेळी फोटो खराब निघतो. अशा फोटोसाठी आपण मोशन स्टिल अॅप वापरू शकतो. एवढेच नाही तर ‘मोशन स्टिल’ ने कोणत्याही लाइव्ह फोटोला ‘जीफ’ इमेजमध्ये परावर्तीत करू शकतो. इंस्टंट मेसेजिंगच्या दुनियेत ‘जीफ’ फोटोचा वापर वेगाने वाढू लागला आहे. अशारितीने फोटोमध्ये असलेला व्यक्ती, प्राणी किंवा अन्य वस्तू एकच गोष्ट वारंवार करताना दिसून येते.
पिक्सलर-फ्री फोटो एडिटर : या अॅपचा वापर अँड्राइड, आयओएस आणि विंडोजसारख्य तीन प्रमुख ऑपरेटिंग सिस्टमवर करता येतो. या अॅपच्या मदतीने फोटोला चांगले इफेक्ट देण्याबरोबर कोलाजही करता येऊ शकते आणि फोटोला अनेक बाजूने अॅडजेस्टही करता येते. याचा इंटरफेस यूजर फ्रेंडली केले आहे. कोणताही व्यक्ती सहजगत्या फोटोचा दर्जा सुधारू शकतो. पिक्सलर अॅपवर पेन्सिल स्केच फिनिश, अॅटो बॅलेन्स आणि कलर स्प्लॅशसारखे अनेक फिचर उपलब्ध आहेत, जे की आपल्याला अनेक आकर्षक लूक देतात.
वीएससीओ कॅम अॅप: या अॅपच्या माध्यमातून फोटो काढण्यापूर्वी एडिट करू शकतात. व्हीएससीओ कॅममध्ये असे अनेक फिल्टर आहेत की त्यात काही निकष निश्चित केले आहेत की फोटो कसे काढावेत. हा अॅप अँड्राईड, आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. गूगल प्लेस्टोअरवर या अॅपला 4.4 रेटिंग आहे. आतापर्यंत एक कोटीहून अधिक यूजरने हा अॅप डाऊनलोड केला आहे.
Check Also
सौंदर्यप्रसाधने वापरताय?
आजच्या युगात सुंदर दिसण्यासाठी स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण सौंदर्यप्रसाधने वापरत असतात. भारतातील सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ …