फेसबुकवरून आपण खरेदी विक्री देखील करू शकतो. परंतु आर्थिक व्यवहार करताना सुरक्षितता पाहणे अगोदरच गरजेचे आहे.
सहज विश्वास ठेवू नका: फेसबुक आणि तत्सम सोशल मिडिया संकेतस्थळे ही व्हर्चऊल फ्रेंडशिपसाठी आदर्श मानले जातात. परंतु या आधारावरच या सोशल मिडियावर विश्वास ठेवणे धोक्याचे ठरते. संपूर्णपणे ऑनलाईनवर विश्वास न ठेवता डोळसपणे व्यवहार करावा. तोंडओळखीवर व्यवहार करणे टाळावे. कधी कधी फेसबुक अकाऊंट फेक असू शकते किंवा गैरमार्गाशी जोडलेले असू शकते.
वैयक्तिक गोष्टी शेअर करू नका: फेसबुकसारख्या सोशल मिडियावरून व्यवहार करताना पर्सनल डिटेल शेअर करणे टाळावे. जर तुम्ही घरात एकटे राहत असाल, गृहीणी म्हणून दिवसभर घरात एकट्याच राहत असाल किंवा नोकरीची वेळ, घरी येण्याची वेळ यासारख्या गोष्टी शेअर करू नये. त्याचा गैरफायदा गुन्हेगारी वृत्तीची मंडळी घेऊ शकतात. कुरियरच्या निमित्ताने आलेले लोक आपल्यासाठी कधी कधी धोकादायक ठरू शकतात. जर तुम्ही एकटे राहत असाल तर पार्सल डिलिव्हिरीसाठी कार्यालयीन पत्ता द्यायला हरकत नाही.
वैयक्तिक माहिती गोळा करणे: कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी समोरील व्यक्तीची माहिती गोळा करणे गरजेचे आहे. संबंधिताची सोशल मिडियावर असलेले विवरण, त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती याबाबत माहिती गोळा करावी. जर संशय वाटला तर त्याची चौकशी करण्यास हरकत नाही. अनोळखी व्यक्तीवर एकदम विश्वास टाकू नये आणि त्यालाही गैरसमज होऊ नये यासाठी बाहेरून माहिती मिळवावी जेणेकरून खात्रीशीर व्यवहार करता येतील.
बैठकीबाबत सुरक्षा बाळगा : सोशल माध्यमातून एखादा व्यवहार ठरला असेल किंवा वस्तूची खरेदी-विक्री होत असेल तर अशावेळी पती, मित्र किंवा शेजारी राहणार्या मंडळींना सोबत घ्यावे. त्याचवेळी बैठकीदरम्यान अंगावर कोणतीही महागडी वस्तू, दागिणे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. व्यवहारात पारदर्शकता कशी राहिल याची खबरदारी घ्यावी आणि कागदोपत्री पुरावे राहतील, अशा पद्धतीने व्यवहारावर भर द्यावा.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …