सध्या एक स्लोगन खूपच व्हायरल होत आहे. ‘बटेंग तो कटेंगे.’ अर्थात ती भुलभुलैय्या निर्माण करणारे स्लोगन आहे. याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा राहू शकतो. ज्याने त्याने आपापल्या परीने त्याचा अर्थ लावायचा. आता तर त्याच्याशी मिळतेजुळत्या स्लोगनचे पेव फुटले आहे. पण मुळातच बटेंगेसाठी आपण एकत्र आहोत का, याचा विचार करायला हवा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करुन शंभरीकडे जाणार्या भारतातील समाज आज जातीजातींमध्ये ‘बटलेला’ आहे. स्री-पुरुष अशी विभागणी इथे झालेली आहे. फाटाफूट इतकी झाली आहे आणि आपण एवढे वेगळे झालो आहोत की ते इतक्यात सहजासहजी जुळेल, असे वाटत नाही.
एखादी घोषणा किंवा स्लोगन हे कधी गाजेल आणि कोठे फीट बसेल, हे सांगता येत नाही. संपूर्ण जाहिरातीचे तंत्रच या गोष्टीवर फिरत राहते. एखाद्या काळातील निवडणुकीच्या ंहंगामात पक्षाने आणि नेत्याने दिलेली घोषणा किंवा आवाहन हे अचानक चर्चेत ंयेते आणि ते काहीवेळा प्रसिद्धीच्या शिखरावर नेणारी ठरले. मात्र त्याचवेळी काही घोषषांनी कधी कधी त्यांचा खेळही बिघडवून टाकलेला आहे. सध्या एक स्लोगन खूपच व्हायरल होत आहे. ‘बटेंग तो कटेंगे.’ अर्थात ती भुलभुलैय्या निर्माण करणारे स्लोगन आहे. याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा राहू शकतो. ज्याने त्याने आपापल्या परीने त्याचा अर्थ लावायचा. आता तर त्याच्याशी मिळतेजुळत्या स्लोगनचे पेव फुटले आहे.
तूर्त प्रश्न फूट पडण्याचा आहे. एका लोकप्रिय जुन्या म्हणीप्रमाणे एकता मे शक्ती. एक काठी असेल तर ती सहजपणे मोडली जाते, परंतु मोळी (एकत्र काठ्या) असेल तर ती तुटत नाही. मोकळा हात कमकुवत करतो तर मुठ ही वज्रमूठ ठरते. फूट पडली की समजा आपण संपलो. संघटना ही ताकद असते आदी आदी. लहानपणासून या गोष्टी ऐकत आलो आहोत. मात्र प्रत्यक्षात वेगळेच काहीतरी दिसते, वेगळेच शिकवले जाते आणि वेगळेच नजरेस पडते. जे काही दिसते, तेथे फाटाफूट पडलेली असते. सर्व काही विखुरलेले असते.
आता जातींचे पाहा. भारतात जातींची काही कमतरता नाही. ऐक्यात शक्ती आहे, परंतु समाज जातिजातीत विभागला गेला आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा जातितील फाटाफूटीबाबत बोललल्याचे आजपर्यंत ऐकीवात आले नाही. याउलट जातींना आता मायस्क्रोपिक पातळीपर्यंत स्वतंत्र केले आहे. विभागनिहाय, राज्यनिहाय एवढ्या अमूक जाती, तमूक जाती. हे पाहून डोकं गरगरायला लागते. जातीत पोटजात शोधली जात आहे आणि त्याचा एवढा शोध घेतला जात आहे की, कदाचित ती जात एखाद्याला ठाऊक नसेल, त्यापासून क्वचितच एखाद्याला फायदा झाला नसेल, परंतु स्वार्थी राजकारण्यांनी आपली मतांची पोळी भाजून घेतली आहे. जातीच्या जोरावर नेत्यांनी आपले काम एवढ्या ताकदीने केले आणि आपल्या जातीचे मत दुसरीकडे जाणार नाही आणि दोन जाती एकत्र येणार नाही असा पुरता बंदोबस्त करून ठेवला. वास्तविक जातीजातीत भेद निर्माण होण्याचा मुद्दा तर जातनिहाय जनगणनेतूनच बाहेर पडणार आहे. म्हणून भविष्यात युद्धासाठी सीमे-पलीकडील शत्रूंची गरजच भासणार नाही. जातीजातीतील संघर्षच पुरेसा असून तो सर्वांना भारी ठरेल.
या फाटाफुटीचा परिणाम म्हणजे स्वातंत्र्य मिळवून 77 वर्षेझाली तरी आपण जातीच्या आरक्षणात अडकलो आहोत आणि त्याचा शेवट होताना दिसत नाही. विशेष म्हणजे राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण केवळ दहा वर्षांसाठीच ठेवले होते. दहा वर्षानंतर त्याचा आढावा घेणे अपेक्षित होते. पण आढावा तर सोडा, ओबीसी, दिव्यांग, माजी स्वातंत्र्यसैनिक, आर्थिकदृष्टया कमकुवत यामध्येही आरक्षण देण्यात आले. बढतीत आरक्षण दिले गेले. याचाच अर्थ आरक्षणाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आणि फूट पडण्याची पातळी ही वेगळ्याच स्तरावर पोचली. अर्थात त्याचे उद्देश जगजाहीर आहेत.
एससी, एसटी, ओबीसी आदींत आपण विभागलेलो गेलेलो आहोत. जोडण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे आणि आरोप-प्रत्यारोपाचे प्रकार सुरू आहोत. एवढी दरी निर्माण होऊनही बटेंगे तो कटेंगे असे मनावर बिंबवले जात आहे. वास्तविक आपण विभागनिहाय, प्रदेशनिहाय पातळीवरही वेगळो झालेलोच आहोत. उत्तर-दक्षिण यांच्यात बंध असणे असणे अपेक्षित असताना दूरत्वभाव दिसून येते. ही फुटीची दरी भरून काढण्यासाठी आतापर्यंत कुणीही म्हटले नाही की ‘बटोंगे तो कटोंगे’. उलट ही दरी आणखी रुंदावण्यासाठीच अनेक जण आसुसलेले आहेत. दोन प्रकारचे जग असून तेथे उघड उघड फूट पडलेली दिसून येते. एवढेच नाही तर प्रादेशिक पातळीवरच्या दुजाभावाचा सर्वात वाईट अनुभव ईशान्य आणि उर्वरित भारताचा आहे. एक देश, एक सूर असतानाही ईशान्येकडील सात राज्यांची नावे देखील दुभंगलेल्या मनाचा सामना करणार्या आपल्यासारख्या लोकांना ठाऊक नाही. राजधानी दिल्लीत या राज्यांचे प्रतिनिधी बसलेले असतात. त्यांना जरा विचारून पाहा की चिनी म्हटले तर काय वाटते. त्यांच्यात किती ऐक्याची भावना निर्माण होते, ते पाहा. आपण स्त्री-पुरुष समानतेचे पुरस्कर्तेआहोत. महिलांना समानतेचा हक्क दिला आहे आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांना जागा दिली आहे. प्रोत्साहन दिले आहे. मात्र आजही तेथे फूट, वेगळेपणाची भावना दिसून येते. महिलांच्या हक्कांबाबत जागरूक असलेल्याा महिला आयोगाच्या डोक्यात महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी काही नवीन गोष्टी जोडण्याचा विचार आला आहे. शिवणकाम, ब्युटिशियन, नृत्य शिक्षक आदींतही महिलां असाव्यात असे म्हटले आहे. या उपायांमुळे सुरक्षेची हमी मिळेल. कदाचित पुढच्या यादीत महिलांसाठी महिला बांगडीवाले, महिला टॅक्सी चालक, रेस्टॉरंटमध्ये महिला कुक, प्रत्येक आजारांवर उपचार करण्यासाठी महिला डॉक्टर, मेहेंदी लावण्यासाठी महिला आदीं ठिकाणी महिलांच हव्यात असा आग्रह केला जाईल. बरे झाले, आपल्याकडे पुरुष आयोग स्थापन झालेला नाही, नाहीतर आतापर्यंत काय काय पाहवयास मिळाले असते! कोणास ठाऊक. पुरुषांसाठी पुरूष परिचारिक, विमानात पुरूष एअर होस्ट, बाजारात पुरूष दुकानदार असे भलतेच चित्र दिसले असते. एक पुरुषाचे जग आणि एक महिलांचे जग. कोणाचा कोणाशी संबंध नाही. सोयरसूतक नाही. सर्वकाही वेगळे, स्वतंत्र. सर्वच दुभंगलेले. पुरुषांच्या बरोबरीने महिला, परंतु दोघांचे जग वेगळे.
किती चांगले विचार आहेत. अशा जगात कोणाला चुकीचे काम करण्यापासून रोखू शकत नाहीत. समाज बदलू शकत नाहीत, कायद्याचा धाक अजिबातच नाही. त्यामुळे हा उपाय सोपा आहे. सर्वांना चार भिंतीत ठेवा. कोणाला जर बाहेर पडायचे असेल तर त्याने तसे लिहूनच घराबाहेर स्वत:च्या जबाबदारीवर पडावे. लक्ष्मणरेषा आखली जाईल. जो बाहेर पडेल, त्याने स्वत:ला सांभाळावे. किती सोप्पं आहे. चूक कोणाची सांगायची, तक्रार कोणाची करायची? अर्थात आपणच फुटण्यास तयार आहोत तर साहजिकच कोणीतरी त्याचा फायदा नक्कीच उचलेल. दुर्देव म्हणजे फाटाफूट इतकी झाली आहे, एवढे वेगळे झालो आहोत की ते इतक्यात सहजासहजी जुळेल, असे वाटत नाही. म्हणून एकच प्रार्थना करा. सुबुद्धी येऊ दे आणि सर्वांना केवळ जोडण्याचा मुद्दा समजला तरी पुरेसे. जे ‘बटने आणि काटने’ चा सल्ला देत आहेत, त्यांचे विचार आणि उद्देश चांगला असू दे.– योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक
Check Also
राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष
परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …