करीना कपूर खान ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले. दोन दशकांहून अधिक काळ ती चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. या काळात करिनाने इंडस्ट्रीतील सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले.
नुकतेच, एका मुलाखतीदरम्यान, तिने चित्रपटात काम करण्यासाठी फी किती घेतली जाते याबद्दल मनोरंजक उत्तर दिले आहे.
प्रत्येक चित्रपटासाठी 10-15 कोटी रुपये फी घेणार्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला, ज्यावर तिने अतिशय मजेशीर उत्तर दिले,’पैशाला माझ्यासाठी कधीच प्राधान्य राहिले नाही. तिने गमतीने पुढे सांगितले की, ती सध्या स्ट्रगल करत आहे आणि पती सैफ अली खानच्या घरी राहत आहे.’
करीना म्हणाली, ‘मी कोणताही चित्रपट पैशासाठी नाही, तर त्यात साकारलेल्या पात्रासाठी निवडते. माझ्यासाठी प्रथम प्राधान्य चित्रपटातील पात्र असते. एखादे पात्र आवडत असेल तर ती कमी पैशातही तो चित्रपट करू शकते. हे माझ्या मूडवर अवलंबून आहे, चित्रपट काय आहे आणि मला चित्रपटात कोणती भूमिका मिळतेय यावर अवलंबून आहे माझ्यासाठी पात्र अधिक महत्त्वाचे आहे असं म्हणत अभिनेत्रीने आपल मत मांडल.
करीना कपूर खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची ‘क्रू’मध्ये दिसली होती. हा चित्रपट व्यावसायिक यशस्वी ठरला. यानंतर ती हंसल मेहताच्या ‘द बकिंघम मर्डर्स’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 13 सप्टेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय ती ‘सिघम अगेन’मध्येही दिसणार आहे. यंदाच्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.- अवंती कारखानीस
Check Also
चिंतनशील दिग्दर्शकाचा निरोप
चित्रपटाच्या माध्यमाचा वापर समाजाला आरसा दाखविण्यासाठी करणार्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल यांचा समावेश होतो. बॉलिवूडच्या …