लेख-समिक्षण

नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करताना…

ही वर्षांपूर्वी नोकरीसाठी अर्ज भरण्यासाठी एक पारंपारिक पद्धती वापरली जात असे. बर्‍याचदा पोस्टाद्वारे अर्ज केल्यानंतर तो अर्ज पोहचला की नाही, हे पाहण्यासाठी कुठलीच सोय उपलब्ध नव्हती. ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या पद्धतीमुळे या समस्यांचे निराकरण झाले आहे. पण ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या गोष्टी काय आहेत ते पाहू.
———————–
सध्याच्या काळात नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज पाठवावा लागतो. ही सुविधा चांगली व कमी त्रासदायक असली, तरी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे व काही नियम पाळणे गरजेचे आहे.
•आधी वाचावे : नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणींच्या मेलबॉक्समध्ये दररोज किंवा दोन-तीन दिवसांत एखादा नोकरीशी संबंधित एखादा मेल येऊन पडतोच. यातील काही संधी याच केवळ आपल्या प्रोफाईलशी संबंधित असणारे असतात. पण बरेचसे लोक हे मेल न वाचताच त्यांना उत्तरे पाठवत असतात. त्यामुळे आपला अकारण वेळ जातो आणि उत्तरे आली नाहीत की काहीसे दडपणही येते. त्यामुळे आलेले मेल आधी तपासावेत.
•संपर्कात रहावे : सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करून आपल्या क्षेत्रातील व्यक्तींच्या संपर्कात रहावे. अनेकदा एखादी मोठी कंपनी आपल्या कंपनीत नोकरीसाठी निघणार्‍या जागांची माहिती आपल्या वेबसाईटवर देते. आपल्याला वेळेत त्या वेबसाईटवर पोहोचून माहिती घेणे खूप महत्त्वाचे असते. गूगल अ‍ॅलर्ट सर्व्हिस आपल्याला या बाबतीत मदत करू शकते.
•कव्हर लेटर : नोकरीसाठी पाठवण्यात येणार्‍या रिज्युमेसोबत कव्हर लेटर लिहिणे खूप महत्त्वाचे आहे. हवे असल्यास मेलसोबतच एक छोटासा सिनॉप्सिस लिहून पाठवावा. हे कव्हर लेटर लहान व मुद्देसूद असणे खूप महत्त्वाचे आहे. काहीजणांना अगदी रिज्युमेइतके मोठे कव्हर लेटर लिहिण्याची सवय असते. पण तसेही करू नये. कव्हर लेटरमध्ये आपले शिक्षण आणि थोडक्यात अनुभव लिहिणे पुरेसे असते. कव्हर लेटर इंग्रजीतूनच असावे. कारण त्यामुळे फाँटची समस्या उद्भवत नाही.
•मागोवा घेत राहणे : नोकरीसाठी आपली मुलाखत अथवा परीक्षा झाल्यानंतर कंपनीच्या एचआरशी बोलून घ्यावे. आपल्या मेलला उत्तर न आल्यास पुढचा मेल एका आठवड्याभराने पाठवावा. उतावळेपणाही दाखवू नये.
याशिवाय मेल पाठवताना आपली भाषा औपचारिक असावी. आपल्या भाषेत कुठेही ‘डिअर’ इत्यादी शब्द येऊ नयेत. त्याचबरोबर आपल्याला नेहमी चॅटिंगच्या सवयीमुळे एखाद्या मेसेजच्या शेवटी स्माइली किंवा स्टिकर पाठवण्याची सवय असते. औपचारिक ईमेलमध्ये अशा गोष्टी चालत नाहीत. आपली भाषा संपूर्णपणे औपचारिक असण्याची काळजी घ्यावी. ‘प्लीज’, ‘थँक्यू’ अशा वाक्यांचा वापर योग्य प्रकारे करावा. यामुळे आपल्या ईमेल पाठवण्याच्या पद्धतीवर एक संस्कार होऊन त्याचा आपल्याला फायदा होईल.

Check Also

जग काय म्हणेल?

जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *