रेंगाळणारे रशिया युक्रेन युद्ध आणि इस्राईल-इराण संघर्ष या कारणांमुळेही भारताच्या आर्थिक चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. जगातील युद्धग्रस्त देशातील संघर्ष आणखी चिघळला तर तर कच्च्या तेलाच्या जागतिक बाजारात किंमती वाढण्याची मालिका सुरू होऊ शकते आणि कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या तर जगभरात अनेक वस्तूंच्या किंमती वाढण्याबरोबरच भारतात देखील महागाई मी मी म्हणू शकते. सध्या देशात महागाई भडकण्याचा ट्रेंड हा स्पष्टपणे दिसत आहे. ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाईचा दर वाढत चार महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर आहे. एवढेच नाही तर जागतिक शेअर बाजाराबरोबरच आता भारताच्या शेअर बाजारावरही जगातील संघर्षाचा नकारात्मक परिणाम होताना दिसत आहे.
रेंगाळणारे रशिया युक्रेन युद्ध आणि इस्राईल-इराण संघर्ष या कारणांमुळेही भारताच्या आर्थिक चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. या चिंता बाजारातील किरकोळ वस्तूंच्या वाढत्या किंमती, शेअर बाजारातील घसरण, मालवाहतुकीचा वाढता खर्च, खाद्य वस्तुंची महागाई, भारतातून चहा, मशिनरी, पोलाद, रत्न, दागिने तसेच फुटवेअर यासारख्या क्षेत्रातील कमी होणारी निर्यात, निर्यातीसाठीच्या विम्यापोटी येणार्या खर्चात वाढ तसेच युद्धात अडकलेल्या देशांसमवेतचा कमी होणारा द्वीपक्षीय व्यापार या रुपातून आहे.
एवढेच नाही तर जागतिक शेअर बाजाराबरोबरच आता भारताच्या शेअर बाजारावरही जगातील संघर्षाचा नकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. पश्चिम आशियातील संकट आणि चीनकडून सरकारच्या पाठबळावर बाजार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील काही परकी गुंतवणुकदार संवेदनशील आणि जोखमीच्या वाटणार्या मालमत्तांची करत असून ते मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेताना दिसून येत आहे. परिणामी शेअर बाजाराचा निर्देशांक आणि निफ्टी यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे दोन महिने गेल्या दोन वर्षातील सर्वात मोठ्या घसरणीचे म्हणून दिसले. पश्चिम आशियाच्या संघर्षादरम्यान गुंतवणूकदार हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे जागतिक पातळीबरोबरच भारतात देखील सोन्याला मागणी वाढत असून किंमतीही वधारल्या आहेत.
चिंताजनक मुद्दा म्हणजे इराण आणि इस्राईल यांच्या संघर्षाचा परिणाम जागतिक जलवाहतुकीवर देखील होऊ शकतो. जगातील सुमारे एक तृतियांश तेल आणि खाद्य व कृषी उत्पादनाची वाहतूक याच मार्गाने होते. म्हणून खाद्य पदार्थ जसे गहू, साखर आणि अन्य कृषी उत्पादनाच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. तसेच इराण आणि इस्राईल युद्धाचा अप्रत्यक्ष परिणामही भारताच्या औषधी क्षेत्रावर पडू शकतो. कारण भारत अजूनही बहुतांश औषधांसाठी लागणारा कच्चा माल हा परदेशातूनच आयात करतो. अशावेळी औषधांच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पश्चिम आशियात युद्धाची तीव्रता वाढल्याने भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण आणि महागाई वाढीचे वातावरण तयार होताना दिसत आहे. अर्थात पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान भारताची आर्थिक स्थिती भक्कम राहण्यामागे देखील काही घटक कारणीभूत असून त्यामुळे सामान्य नागरिक आणि अर्थव्यवस्थेला फारसा फटका बसला नाही आणि बसणार नाही.
प्रामुख्याने सध्या भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम आहे. भारत विपूल खाद्यान्न असणारा देश आहे आणि देशातील 80 कोटीपेक्षा अधिक गरीब लोकांना मोफत खाद्यान्न वितरीत केले जात आहे. पश्चिम आशियाच्या संघर्षादरम्यान भारतावर जगाचा आर्थिक दृष्टीकोनातून विश्वास वृद्धिंगत झाला आहे. नव्या आकडेवारीनुसार 21 नोव्हेंबरपर्यंत भारताकडे 650 अब्ज डॉलरपेक्षा अधिक परकी गंगाजळी आहे. त्यामुळे भारत कोणत्याही आर्थिक संकटाला सहजपणे सामना करू शकतो. जगातील युद्धग्रस्त देशातील संघर्ष आणखी चिघळला तर तर कच्च्या तेलाच्या जागतिक बाजारात किंमती वाढण्याची मालिका सुरू होऊ शकते आणि कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या तर जगभरात अनेक वस्तूंच्या किंमती वाढण्याबरोबरच भारतात देखील महागाई मी मी म्हणू शकते.
इराण हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे आणि त्याचे स्थान पश्चिम आशियातील संवेदनशील भागात आहे. अशावेळी इराणच्या तेलबाजारात अस्थैर्य आल्यास कच्च्या तेलाच्या किंमती वाढू शकतात आणि पेट्रोल, डिझेल आणि अन्य पेट्रोलियम पदार्थ देखील महाग होऊ शकतात. तसेच सध्या देशात महागाई भडकण्याचा ट्रेंड हा स्पष्टपणे दिसत आहे. चौदा नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत (एनएसओ) जारी आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाईचा दर वाढत 2.36 टक्क्यांवर पोचला आणि तो चार महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर आहे. गेल्या महिन्यांत खाद्य पदार्थ प्रामुख्याने भाजीपाला आणि प्रोसेस्ड वस्तुंच्या किंमती वाढल्या. सप्टेंबर 2024 मध्ये घाऊक मूल्य निर्देशांक आधारित महागाईचा दर 1.84 टक्के होता. 12 नोव्हेंबर रोजी प्रकाशित आकडेवारीनुसार ऑक्टोबर 2024 मध्ये किरकोळ महागाईचा दर 5.49 टक्के नोंदला गेला आणि ऑगस्ट महिन्यात तो 3.65 टक्के होता. बटाटे, कांदा, लसून यासह सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांच्या किंमतीतील वाढ तसेच महाग झालेले धान्य आणि फळांमुळे ऑक्टोंबर महिन्यांत खाद्य वस्तुंचा किरकोळ महागाईचा दर वाढत 10.87 टक्क्यांवर पोचला. सप्टेंबर महिन्यात हाच दर 9.24 टक्के होता आणि ऑगस्ट महिन्यांत 5.66 टक्के.
पश्चिम आशियातील संघर्ष सुरू असताना सरकारला देखील महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वसमावेशक रणनिती आखावी लागेल, यात कोणाचेही दुमत नाही. पश्चिम आशियात वाढत्या तणावामुळे जागतिक पातळीवर तेलाच्या किंमतीत झालेली वाढ पाहता पेट्रोलियम खात्याचे मंत्री हरदिप सिंग पुरी म्हणाले, पश्चिम आशियात तणाव वाढला असला तरी भारत कच्च्या तेलामुळे निर्माण होणार्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी खंबीर आहे. पूर्वी भारत 27 देशांकडून कच्च्या तेलाची आयात करत होता आणि आता 39 देशांकडून तेलाची आयात केली जात आहे. तरीही 2024-25 च्या अर्थसंकल्पात महागाईवर अंकुश बसविण्यासाठी निश्चित केलेल्या उपायांची तातडीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
पश्चिम आशियातील संघर्ष आणि रशिया युक्रेन युद्धाची व्याप्ती वाढली तर सरकारला बाजाराची घसरण थांबविण्यासाठी देखील व्यापक रणनिती आखावी लागेल. देशात ‘पीएलआय’ योजनेनुसार औषधी उद्योगात आवश्यक ज्या 35 प्रमुख कच्च्या मालांचे उत्पादन होत असताना आणखी सुमारे 18 प्रकारच्या कच्च्या मालाला त्यात जोडावे लागणार असून या योजनेनुसारच त्याचे उत्पादन करण्यासाठीही देशाला वाटचाल करावी लागेल. या उपायांतून देशात औषधांच्या किंमती वाढणार नाहीत. अशा सर्वंकष रणनितीतूनच देशातील सामान्य आणि अर्थव्यवस्था ही पश्चिम आशियातील संघर्ष आणि लांबणार्या रशिया युक्रेन संघर्षामुळे होणारे दुष्परिणाम यापासून वाचवता येणे शक्य आहे.-डॉ. जयंतीलाल भंडारी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ
Check Also
राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष
परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …