ब्रिटनमधील एका कंपनीने सॅटेलाईटशी स्पर्धा करणार्या सोलर-इलेक्ट्रिक ड्रोनची निर्मिती केली आहे. ‘पीएचएएसए-35’नावाचे हे ड्रोन सॅटेलाईटपेक्षाही सरस असल्याचा कंपनीचा दावा आहे. लवकरच ते सॅटेलाईटची जागाही घेऊ शकेल असेही कंपनीचे म्हणणे आहे. हे ड्रोन पांडाच्या वजनाइतके म्हणजेच केवळ 150 किलोंचे आहे. एखाद्या सॅटेलाईटचे वजन हजारो किलोंचे असते. हे ड्रोन बनवण्यासाठीचा खर्चही तुलनेने अतिशय कमी आहे. सॅटेलाईट म्हणजेच कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीच्या वातावरणाच्या चौथ्या स्तरात स्थित असतात. या स्तराला ‘थर्मोेस्फियर’असे म्हटले जाते. याठिकाणी गुरूत्वाकार्षण शक्ती नसते आणि त्यामुळे ते पृथ्वीच्या कक्षेत फिरत असतात. या सॅटेलाईटस्त्रा बॅटरीच्या माध्यामाधून ऊर्जा मिळते. ही बॅटरी सॅटेलाईटस्त्रा जोडलेल्या जोडलेल्या सोलर पॅनेलच्या सहाय्याने चार्ज होत असते. बॅटरीचे आयुष्य संपल्यावर हे सॅटेलाईट निकामी होतात. त्यामुळे अंतराळात ते निव्वळ एक कचरा म्हणून राहतात. ‘पीएचएएसए-35’ हे ड्रोन वातावरणाच्या दुसर्या स्तरात म्हणजेच ‘स्ट्रॅटोस्फियर’मध्ये स्थित असतात. याठिकाणी पृथ्वीची गुरूत्वाकर्षण शक्ती कार्यरत असते. त्यामुळे त्याला अवकाशात स्थित राहण्यासाठी पंख फिरवत राहावे लागते. त्याचे पंख म्हणजेच सोलर पॅनेल्स आहेत. ते दिवसा सूर्याच्या ऊर्जेने फिरतात तसेच बॅटरीही चार्ज करतात.
रात्रीच्या वेळी हे ड्रोन बॅटरीच्या ऊर्जेवर काम करते. एका वर्षात त्याच्या बॅटरीचे आयुष्य संपण्यापूर्वीच त्याला जमिनीवर उतरवले जाऊ शकते. त्याचे पंख 115 फूट लांबीचे आहेत. त्यामध्ये सोलर पॅनेल बसवले आहेत. या ड्रोनमध्ये कॅमेरा, सेन्सर, कम्युनिकेशन इक्विपमेंट यासारखे 15 किलोपर्यंतचे सामान ठेवता येऊ शकते. ज्याठिकाणी इंटनरेटसारख्या सुविधा पोहोचत नाहीत, अशा दुर्गम ठिकाणीही ते 4-जी आणि 5 जी कम्युनिकेशन सुविधा देण्यास सक्षम आहे. ड्रोनचे वजन बरेच कमी असल्याने त्याला सॅटेलाईट टेक्नॉलॉजीला पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
Check Also
प्रेरणादायी संघर्षगाथा
कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत …