लेख-समिक्षण

डॉ. आंबेडकर यांच्यावर बोलून अमित शहा वादात

डॉ. आंबेडकर यांच्यावर बोलणे एक फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर…..एवढे नाव देवाचे घेतले असते तर सात जन्मापर्यंत स्वर्ग मिळाला असता, असे केंद्रीय मंत्री अमित शहा लोकसभेत म्हणाले. हे बोलल्यावर त्यांचा व्हिडिओ व्हायरला झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा यांच्या समर्थनार्थ सहा ट्विट केले. तर स्वत: गृहमंत्री शहा यांनी पत्रपरिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. मात्र, त्यांच्या विधानाचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळात उमटले.विरोधकांनी या मुद्यावरून विधान परिषदेत सभात्याग केला. तर विधानसभेत डॉ. नितीन राऊत यांनी हा मुद्दा उचलून धरला.
पत्रकार परिषदेत देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, काँग्रेस पक्ष संविधान आणि आरक्षण विरोधी असून त्यांनी नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. काँग्रेसने माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून भ्रम पसरवले. आपण स्वप्नातही आंबेडकरांचा अपमान करू शकत नाही. काँग्रेस पक्ष आंबेडकर विरोधी आहे. काँग्रेस पक्ष संविधान विरोधी आहे. बाबासाहेबांच्या पश्चातही काँग्रेसने कधी बाबासाहेबांना आदर दिला नाही. राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा आयोजित करण्यात आली होती. यात देशाची 75 वर्षांची गोरवशाली यात्रा, विकास यात्रा आणि उपलब्धी आदींवर चर्चा करण्यात आली. संसदेत पक्ष आणि विरोधक आहेत. लोकांचे स्वतःचे मत असणे स्वाभाविक आहे. पण संसदेत जेव्हा चर्चा होते तेव्हा ती वस्तुस्थिती आणि सत्याला धरून असावी. मात्र, कालपासून काँग्रेसने ज्या पद्धतीने वस्तुस्थिती विपर्यास करून मांडली याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. भाजपच्या वक्त्यांनी, काँग्रेस आंबेडकर विरोधी पक्ष आहे, संविधान विरोधी आहे, असे सांगितले. काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला. काँग्रेसने आणीबाणी लादून राज्यघटना पायदळी तुडवली. काँग्रेसने भारतीय सैन्याचा अपमान केला. काँग्रेसने भारताची भूमी देऊन टाकली, या गोष्टी संसदेत सिद्ध झाल्यानंतर, काँग्रेसने खोटे पसरवण्यास सुरुवात केली. काँग्रेस पक्ष आंबेडकरविरोधी आहे. पंडितजींच्या (नेहरू) अनेक पुस्तकांत लिहिलेले आहे की, त्यांनी बाबासाहेबांना कधीही योग्य स्थान दिले नसल्याचे शहा यांनी सांगितले.
काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न दिले नाही, पंडित नेहरूंनी स्वतःला भारतरत्न देऊन घेतले. काँग्रेसने आपल्या नेत्यांना भारतरत्न दिले. त्यांनी आंबेडकरांना 1990 पर्यंत भारतरत्न मिळणार नाही याची व्यवस्था केली. तसेच बाबासाहेबांची 100वी जयंती साजरी करण्याचीही मनाई केल्याचा दावा शहा यांनी केला. तसेच आपली विधाने चुकीच्या पद्धतीने विपर्यास करून मांडण्यात आली. काँग्रेस खोट्या बातम्या पसरवते. मी आंबेडकरांच्या विरोधात कधीही बोलू शकत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अमित शाह यांच्या कथित आक्षेपार्ह विधानाचा निषेध व्यक्त करण्यासाठी विधिमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधान परिषदेत उभे राहिले असता त्यांना बोलू न दिल्यामुळे आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी वॉक आऊट केले. सभागृहात आम्ही गृहमंत्र्यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला असता ते रेकॉर्डवर यावे, यासाठी सभापती यांनी वेगळी भूमिका घेतली. गृहमंत्री यांचे विधान हे राज्यघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान करणारे आहे. महायुती त्यांचा आदर करत नाही का, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा मुद्दा राज्यातील सभागृहात उपस्थित केला जातो. मग गृहमंत्री यांच्या विधानाचा मुद्दा का उपस्थित होऊ शकत नाही?, असा सवाल करत दानवे यांच्यासह विरोधकांनी सभात्याग करत निषेध नोंदवला. तर विधानसभेत डॉ. नितीन राऊत यांनी हा मुद्दा मांडला. तसेच विधीमंडळ परिसरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

Check Also

राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष

परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *