लेख-समिक्षण

ट्रेंड सिलव्हर बँगल्सचा

अनेक जणींना सेलिब्रेटींची फॅशन फॉलो करणे आवडते. अर्थात सगळ्याच फॅशन फॉलो करणे शक्य नसते. पण सध्या ट्रेंडमध्ये असलेली सिल्व्हर बँगल्स आणि ब्रेसलेटची फॅशन मात्र फॉलो करायला हरकत नाही.
श्र सध्या बाजारामध्ये असा बांगड्यांची भरपूर मोठी रेंज बघायला मिळत आहे. या बांगड्या अत्यंत वैविध्यपूर्ण आहेत. एथेनिक आणि वेर्स्टन अशा दोनही पेहरावावर त्या घालता येतात.
श्र या बांगड्या एक किंवा दोन अशा प्रकारे न घातला हातामध्ये घातल्यानंतर चटकन लक्ष वेधतील अशा संख्येत घातल्या जातात. एकाच प्रकारच्या खूप बांगड्या किंवा मिक्स अ‍ॅण्ड मॅच करून वेगळ्या डिझाईन्सच्या बांगड्या घातल्या तर त्या नक्कीच खूप आकर्षक दिसतात. फक्त त्या घालताना आपण ज्या बांगड्यांचे कॉम्बिनेशन करून घालत आहोत, त्या एकमेकींना चांगल्या प्रकारे मॅच होणार्‍या असाव्यात.
श्र या बांगड्यांमध्ये थोड्या मोठ्या आकारातील बांगड्यांची निवड करावी. त्या अधिक आकर्षक दिसतात. काही जणींना वेगवेगळे मेटल मिक्स करून हटके घालण्याची इच्छा नसते. अशांनी फक्त सिल्व्हरचीच निवड करावी. पण सिल्व्हरमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्सच्या बांगड्या मिक्स अ‍ॅण्ड मॅच कराव्यात. पण ज्यांना वेगवेगळे मेटल्स मिक्स केलेले आवडतात त्यांनी सिल्व्हर बँगल्ससोबत ब्रॉन्झ किंवा कॉपर मेटलची निवड करावी आणि मेटलमध्येही हटके रंगसंगती साधून वेगळेपण आणावे. बिड्स किंवा स्टोन्स यांचा सुद्धा वापर सिल्व्हर बांगड्यांमध्ये करता येऊ शकतो.
श्र तुमच्याकडे एखादे सिल्व्हर ब्रेसलेट आहे पण मनगटावर घातल्यानंतर ते खूप मोठे दिसते, असे असेल तर आपण ते बाजूला ठेवतो. पण तसे न करता त्याचा उपयोग आर्मलेट्स म्हणूनही करता येतो. ही अ‍ॅक्सेसरी स्लिव्हलेस टॉपवर घालावी.
श्र हातामध्ये आपण सिल्व्हर ब्रेसलेट घातले म्हणजे घड्याळ घालण्याची गरज नाही असे समजू नये. सिल्व्हर ब्रेसलेट किंवा बँगल्ससोबत घड्याळही घालता येते. फक्त या सिल्व्हर ज्वेलरीमुळे घड्याळ डॅमेज होणार नाही याकडे लक्ष द्यावे. कारण सिल्व्हर ज्वेलरी थोडीशी जड असल्यामुळे घड्याळाच्या डायलवर ओरखडे उमटू शकतात.
श्र सिल्व्हर बांगड्या या कुठल्याही प्रकारच्या स्किन कलरवर आणि कोणत्याही कपड्यांवर आकर्षक दिसतात. त्यामुळे कोणत्या रंगावर त्या घलाव्यात असा प्रश्नच उरत नाही.

Check Also

जग काय म्हणेल?

जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *