लेख-समिक्षण

जुने टीशर्ट टाकताय?

प्रत्येक कुटुंबातील कपाटात भरभरून कपडे असतात. नवं नवीन फॅशन बाजारात येत असल्यामुळे आपण त्या फॅशनेबल कपड्याची खरेदी करतो. आपल्याला कोणी प्रेमाने गिफ्ट म्हणून दिलेले असतात तर कधी लग्न कार्यात मिळालेले असतात. काही जणांना कपडे खरेदी करण्याची प्रचंड हौस असते. त्यामुळे कपाट खूप भरतं. मग या कपड्यांचे करायचे काय असा प्रश्न मनात तयार होतो? आपल्याला आपले कपडे फेकून द्यायला देखील आवडत नाही. अशा वेळी या कपड्यांचा पुनर्वापर करु शकता.
घरातील काचेच्या वस्तू साफ करण्यासाठी तुम्ही होजियरीचे टिशर्ट, बनियनचा वापर करु शकता. कारण याचे फॅब्रिक नरम आणि मुलायम असतो. त्यांचे चौकोनी आकारात तुकडे कापून तुम्ही क्रोकरी क्लिनर म्हणून वापरू शकता.
याखेरीज जुन्या कपड्यांपासून हेअरबँडही तयार करता येईल. यासाठी डोक्याचे माप घेऊन एखाद्या कपड्याचा लांब तुकडा कापा. मग त्यानंतर गाठ किंवा शिलाई मारुन घ्या. तसेच तुम्ही एखाद्या कपड्याचे छोट्या छोट्या पट्या कापून त्याची वेणी बांधून हेअरबँड तयार करु शकता. याखेरीज घरात ठिकठिकाणी दिसणार हेअर क्लिप तुम्हाला एकत्र ठेवायचे असतील. तर त्यासाठी घरच्या घरी, वॉशेबल, टिशर्टपासून बनवता येणारे क्लिपहोल्डर बनवा. यासाठी टीशर्टचे साधारण 4 ते 5 इंचाचे लांब तुकडे काढून घ्या. तुकडे थोडे ताणून घ्या. त्याची सैलसर वेणी घालून घ्या. अगदी आपण केसांची वेणी घालतो तशी वेणी घाला. या वेणीच्या वरच्या बाजूला टिशर्टपासूनच एक होल्डर करुन घ्या. हे होल्डर तुम्ही खिडक्यांना पडद्याच्या रॉडवर अडकवू शकता आणि त्याला तुमचे सगळे क्लिप लावू शकता.

Check Also

जग काय म्हणेल?

जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *