‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सुरुवातीच्या दिवसापासून आतापर्यंत त्याने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम केले आहेत.
सुमारे 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चार दिवसांत आपल्या बजेटपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. एवढेच नाही तर 500 कोटींच्या क्लबमध्ये सर्वात जलद प्रवेश करणारा हा भारतीय चित्रपट ठरला आहे.
यानंतर आता ‘पुष्पा 2: द रुल’ने रिलीजच्या 11व्या दिवशी म्हणजेच दुसर्या रविवारी देखील मोठे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 725 कोटी 8 लाखांची कोटींची कमाई केली आहे. 9व्या दिवशी चित्रपटाने 36 कोटी 4 लाखांची कमाई केली, तर 10व्या दिवशी ‘पुष्पा 2: द रुल’चं कलेक्शन 63.3 कोटी रुपये होतं.
सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2: द रुल’ ने रिलीजच्या 11व्या दिवशी म्हणजेच दुसर्या रविवारी 75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, ‘पुष्पा 2: द रुल’चे 11 दिवसांचं एकूण कलेक्शन आता 900 कोटींवर पोहोचलं आहे. यामध्ये चित्रपटाने रिलीजच्या 11 दिवसांत तेलगूमध्ये 279.35 कोटी रुपये, हिंदीमध्ये 553.1 कोटी रुपये, तामिळमध्ये 48.1 कोटी रुपये, कन्नडमध्ये 6.55 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 13.4 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
या चित्रपटाने रिलीजच्या 11 दिवसांत विक्रमी 900.5 कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने यशच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर 2’ च्या कलेक्शनचा विक्रम मोडीत काढला आहे. भारतात ‘घॠऋ 2’ चे लाइफटाईम कलेक्शन 859.7 कोटी रुपये होते. त्यामुळे ‘पुष्पा 2: द रुल’ हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.- अवंती कारखानीस
Check Also
मलायका पुन्हा प्रेमात?
अभिनेत्री मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलायका एका मिस्ट्री मॅनसोबत …