लेख-समिक्षण

चार वर्षांची प्रतिक्षा संपली!

2020 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हीडिओवर लाँच झालेल्या ’पाताल लोक’ या सीरिजला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. तेव्हापासूनच या सीरिजचा दुसरा सीझन कधी सुरू होणार याबाबत सातत्याने प्रेक्षकांकडून विचारणा केली जात होती.
आता 4 वर्षांनी प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आहे. काही दिवसांपूर्वीच सीरिजच्या सीझन 2 चा प्रोमो समोर आला होता. आता पाताल लोक 2 च्या रिलीजची अधिकृत तारीख समोर आली आहे.
या लोकप्रिय सीरिजचा दुसरा भाग 17 जानेवारी 2025 ला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या सीझनप्रमाणेच हा दुसरा सीझन देखील प्राइम व्हीडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिल्या सीझनमध्ये जयदीप अहलावत, इश्वाक सिंग आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये जयदीप अहलावत यांनी इन्स्पेक्टर हातीराम चौधरी आणि इश्वाक सिंग यांनी कॉन्स्टेबल अन्सारी यांची भूमिका साकारली होती. दुसर्‍या सीझनमध्ये या कलाकारांसोबतच तिलोत्तमा शोम, नागेश कुकुनूर आणि जाह्नू बरुआ सारखे नवीन चेहरे देखील दिसतील. पहिल्या सीझनला प्रेक्षकांसह समीक्षकांची देखील दाद मिळाली होती. याशिवाय, सीरिजला अनेक पुरस्कारही मिळाले होते.
पहिल्या सीझन एकूण 9 भागांमध्ये रिलीज झाला होता. त्यामुळे दुसर्‍या सीझनमध्ये देखील 9 भाग असण्याची शक्यता आहे. दुसर्‍या सीझनचे दिग्दर्शन अविनाश अरुण धावरे यांनी केले आहे. प्रेक्षक आता या सीरिजच्या ट्रेलरची मागणी करत असून, 17 जानेवारीला येणार्‍या दुसर्‍या सीझनमध्ये नवीन काय पाहायला मिळेल, याची उत्सुकता आहे.- विधिषा देशपांडे

Check Also

मलायका पुन्हा प्रेमात?

अभिनेत्री मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलायका एका मिस्ट्री मॅनसोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *