मुलायम आणि तजेलदार त्वचा आकर्षक व्यक्तीमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. त्वचेची नियमित देखभाल म्हणूनच खूप गरजेची असते. सभोवतालच्या वातावरणाचा, धूळ, धूर, ऊन वार्याचा परिणाम त्वचेवर होत असतो. त्यामुळे बाह्यत्वचा काळवंडते, निस्तेज होते. बारीक धुळीचे कण त्वचेच्या रंध्रांमध्ये अडकून बसतात. अशावेळी त्वचेचे स्क्रबींग करणे आवश्यक असते. त्यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. तसेच त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार दिसू शकते. बाजारात तयार स्क्रब्स भरपूर मिळतात. काहीजणींच्या संवेदनशील त्वचेला बाजारातले स्क्रब मानवत नाहीत तर काही वेळा त्यांची महागडी किंमतही परडवत नाही. म्हणून घरगुती बनवलेले नैसर्गिक स्क्रब केव्हाही उत्तम ठरते. घरगुती स्क्रब निरनिराळ्या पद्धतीने बनवता येते.
राईस स्क्रब ः यामध्ये अर्धा कप दही घ्यावे. त्यात 2 टेबलस्पून तांदळाचे पिठ मिसळावे. आंघोळीच्या आधी हे मिश्रण हलक्या हाताने चोळून संपूर्ण शरीरावर लावावे. नंतर धुवून टाकावे. तुम्हाला अतिशय ताजेतवाने वाटेल.
बदामाचे स्क्रब ः हे खास करून कोरड्या त्वचेसाठी चांगले असते. एक टेबलस्पून बारीक केलेले बदाम दूधात मिसळून पेस्ट बनवावी. या मिश्रणाने चेहरा स्क्रब करावा. काही वेळाने गार पाण्याने चेहरा धुवून टाकावा. गरज वाटल्यास यामध्ये वॉलनर पावडरही टाकावी.
प्लॅटिन स्क्रब ः पाव कप मसूरची डाळ बारीक करावी. त्यात एक चमचा चंदन पावडर आणि संत्र्याचा रस मिसळून स्क्रब तयार करावे. हे स्क्रब फ्रिजमध्ये आठ— दहा दिवस राहू शकते.
सी सॉस्ट स्क्रब ः समुद्री मीठ थोडे जाडसर बारीक करून त्यात थोडे पाणी मिसळावे. याने खास करून गुडघे, कोपरे यावर स्क्रबींग करावे. तेथील काळवंडलेली त्वचा उजळते आणि मऊ होते.
ऑरेंज पील स्क्रब ः ऑरेंज पील पावडरमध्ये काही थेंब इसेंशिअल ऑईल आणि दूध टाकावे. या पेस्टने चेहर्यावर स्क्रबींग करावे. संत्र्याचे साल चेहर्याच्या त्वचेसाठी खूप गुणकारी असते. यामुळे त्वचा स्वच्छ आणि सुंदर हेते. अशा प्रकारे नैसर्गिक स्क्रब घरी बनवून त्याचा वापर केल्याने बाजारातील कृत्रिम स्क्रबची गरज उरत नाही, पैसे वाचतात, शिवाय रिझल्ट उत्तम मिळतो.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …