लेख-समिक्षण

गूढ पृथ्वीच्या पोटातल्या कड्याचे

पृथ्वीच्या पोटात अनेक रहस्ये दडलेली आहेत. आता आपल्या पायांखाली हजारो किलोमीटर खोलीवर एखाद्या कड्यासारखी रचना आढळून आली आहे. पाश्चात्त्य देशांमधील डोनट या खाद्यपदार्थासारखी किंवा आपल्याकडील मेदुवड्यासारखी त्याची रचना आहे. हे कड्याच्या आकाराचे क्षेत्र पृथ्वीच्या तरल कोअरच्या आत आहे, जे आपल्या ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्राच्या गतिशीलतेबाबतचे नवे संकेत देते.
ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या कड्याचा शोध घेतला आहे. मध्यभागी पोकळी असलेल्या गोलाकार रचनेचे हे कडे आहे. पृथ्वीच्या तरल कोअरच्या आतील संरचना केवळ कमी अक्षांशांवर आढळते आणि भूमध्य रेषेच्या समांतर असते. एएनयूच्या भूकंप वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा अद्याप छडा लागला नव्हता. सायन्स अ‍ॅडव्हान्सेस या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पृथ्वीचे दोन कोअर स्तर आहेत. आंतरिक कोअर हे ठोस, सघन असून बाह्य कोअर द्रवरुप, तरल आहे. पृथ्वीच्या कोअरच्या चहुबाजूने मेंटल आहे. नव्या संशोधनात आढळलेली कड्यासारखी संरचना ही पृथ्वीच्या बाह्य कोअरच्या शीर्षस्थानी आहे, जिथे तरल कोअर मेंटलशी जुळते.

Check Also

प्रेरणादायी संघर्षगाथा

कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *