बाल्कनी आणि सदनिका यांचे जसे जवळचे नाते तसेच काहीसे टुमदार बंगला आणि त्यावरील प्रशस्त गच्चीचे आहे. पूर्वी गच्चीवरच्या जागेचा वापर फक्त घरातील अडगळीचे सामान ठेवण्यापुरताच होता.काळ बदलला, बंगल्याची आकर्षक डिझाइन्स आकार घेऊ लागली. अडगळीच्या सामानाची विल्हेवाट झाली आणि गच्चीवर फुलझाडांची कुंडी अवतरली.
गच्चीवरील या उद्यानात मोठ़या प्रमाणावर हिरवळ, छोटे वृक्ष, फुलझाडे यांना प्राधान्य द्यावे. या या बागांची निगराणी ठेवणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे. यासाठी बागबगीचा करताना गच्चीचा 1/3 भागच वापरावा. कुंड्या आकाराने थोड्या मोठ्या आणि एकसारख्या असाव्यात. गच्चीवर सूर्यप्रकाश आणि सावली हे दोन्हीही असण्याची शक्यता असते. त्याप्रमाणे कुंड्यांची निवड करावी. सुंगधी फुले देणार्या जाई, जुई, चमेली मोठ्या कुंडीत बांबूच्या विशिष्ट प्रकारच्या आधाराने छान वाढतात.
गच्चीवर औषधी उद्यानही सहज तयार करता येते. यामध्ये शतावरी, कोरफड, तुळस यांसारख्या वनस्पती लावता येतील.
लावलेली झाडे जगवण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थित हवा. शक्यतो पाणी देण्याची व्यवस्था वरच असावी. पाण्याचा वापर मर्यादित असावा. गच्चीच्या एका कोपर्यात वाळलेली पाने आणि घरातील ओला कचरा कुजविण्यासाठी छोटी बंदिस्त जागा असावी. पक्ष्यांचा त्रास त्यांची तहान भागवण्यासाठी एक छोटी पाण्याची थाळी जरूर असावी. गच्चीच्या कट्टयावर कुंड्या ठेवू नयेत. घरगुती समारंभामध्ये गच्चीवरच्या बागेचा सहभाग असेल तर आनंद द्विगुणित होतो. गप्पागोष्टी, वाचन, चिंतन आणि दैनंदिन बठे व्यायाम यामध्ये या बागेचा ऊर्जास्रोत म्हणून महत्त्वाचा सहभाग आहे.गच्चीवरील बागेस अनेक छोटे पक्षी, मित्र कीटक आणि फुलपाखरे भेट देतात. त्यामुळं एक जैवविविधतेची शाळाच असते.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …