सुंदर केस आणि केशरचना यांचे सौंदर्यातील व व्यक्तिमत्वाली महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्रत्येक स्री केसांची विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी वेगवेगळे हेअर प्रॉडक्ट्स् वापरले जातात. वेगवेगळ्या ब्रँडचे शॅम्पू, कंडिशनर यांवर बराच खर्च केला जातो. पण असे बरेच उपाय करूनही कधीकधी अपेक्षित परिणाम दिसत नाही. कारण केसांना मुळापासून मजबूत करणे गरजेचे असते. आपल्या रोजच्या काही सवयींमुळे नकळत आपणच केसांचे नुकसान करत असतो, हे बर्याचदा लक्षात येत नाही. कोणत्या आहेत या सवयी?
केस स्ट्रेट करताना वापरण्यात येणार्या हिटिंग टूल्स सतत वापरल्याने केस तुटू शकतात, त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याचा वापर करावा.
केस धुताना जास्त गरम पाणी वापरणे टाळा, कारण यामुळे केस अधिक कोरडे होण्याबरोबर स्प्लिट एंडस वाढू शकतात. केस धुताना कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करावा. सतत केस धुणे टाळा, कारण यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते आणि केसांना आवश्यक असणारे पोषण मिळत नाही.
केस सुकवण्यासाठी ब्लो ड्रायरचा वापर टाळा, यामुळे इतर हिटिंग टूल्सप्रमाणे केसांचे नुकसान होऊ शकते.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …