लेख-समिक्षण

काळजी शरीरसंपदा कमावतानाची

नव्या वर्षात बहुतेकजणांच्या यादीत सिक्स किंवा एट पॅक बनवण्याची नोंद असेल. कुणाला शेपमध्ये यायचं असतं तर कुणाला कसरत करून कोणत्या तरी स्पोर्टसाठी शरीर तंदुरूस्त करायचं असतं. मात्र त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणं मात्र गरजेचं असतं. नाहीतर अतिव्यायाम आणि डाएटच्या नावाखाली अयोग्य आहारामुळे शरीर घडवण्याच्या वयात त्याची झीज होऊ लागते. याचे परिणाम लगेच दिसत नाहीत पण तरूणपणात केलेल्या चुकीच्या व्यायामाची शिक्षा शरीराला म्हातारपणी भोगावी लागते. त्यामुळे जिम करताना काही छोट्या गोष्टींची काळजी जरूर घ्या
* सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची ती ट्रेड मिलवर चालताना. ट्रेडमिलवर पाय ठेवताना तो ऑफ असल्याची खात्री करून घ्या.
* बरेचदा मुव्हींग बेल्ट हालत नसल्याचं जाणवतं, अशावेळी त्याची योग्य देखभाल करून घ्यावी अन्यथा पायाच्या शीरांवर अतिरिक्त ताण येतो. फोनवर बोलताना किंवा कानात इअर प्लग लावून त्या नादात ट्रेडमिलवर कधीही चालू नये. आपल्याला झेपेल एवढाच वेळ ट्रेडमिलचा वापर करावा.
* डंबेल्स करताना, पुलअप्स काढताना किंवा कोणतेही मशीन वापरताना तिथल्या इन्ट्रक्टरकडून त्याची माहिती जरूर करून घ्यावी.अन्यथा शरीरातील नसांवर दाब येऊ शकतो.
* रोज पाऊण तास ते सव्वा तास एवढ्या कालावधीतच व्यायाम करावा, त्यापेक्षा जास्त व्यायाम करणं शरीराची झीज करू शकतं. आपण ज्या प्रकारचा व्यायाम करत आहोत त्याच प्रकारचा आहार घ्यावा. त्यात जास्तीत जास्त हिंरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश असावा आणि भरपूर पाणी प्यावं.
* जिममध्ये व्यायाम करताना योग्य कपडे जसे की ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टच घालावा. तो अगदी टाइट नसावा आणि पायात स्पोर्टस शूज घालावेत. घाम पुसायला स्वतंत्र नॅपकीन वापरावा. जीममधील उपकरणं वापरताना ती टिश्यू पेपरने पुसून घ्यावीत.
* अशा छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर नव्या वर्षात शरीरसंपत्ती निर्माण व्हायला काहीच हरकत नाही.

Check Also

जग काय म्हणेल?

जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *