लेख-समिक्षण

कार चालवा बिनधास्त…!

हल्लीचा जमाना धावपळ आणि मोबाईल म्हणजे चालताफिरता कामे करण्याचा आहे. त्यामुळे कार चालवतानाही मेसेजचे उत्तर द्यावे लागते. सरकारी आकडेवारीनुसार 2016 या वर्षामध्ये कार चालवताना मोबाईलचा वापर केल्यामुळे 4 हजार 976 अपघात झाले. अपघातात 2138 लोकांना जीव गमवावा लागला आहे. अशा वेळी कार चालवताना फोनचा वापर करणे हे अपघाताला आमंत्रण देण्यासारखेच आहे. पण ऑटो रिप्लाय अ‍ॅप्सचा वापर करून ड्रायव्हिंग दरम्यान स्वतःला काहीच उत्तर द्यावे लागणार नाही. ही अ‍ॅप्स स्वतःच ही कामे करतील.
असे एक अ‍ॅप गुगलने स्वतःच विकसित केले आहे त्यात ऑटो रिस्पॉन्ड फीचर टाकले आहे. जेणेकरून आपण बेफिकिर होऊन कार चालवू शकतो. अ‍ॅपच्या सेटिंग पर्यायात जाऊन ऑटो रिप्लाय मध्ये आपला मेसेज लिहून ठेवायचा आहे. जसा एखादा मेसेज येईल तेव्हा रिप्लाय वर टॅप केले किंवा स्पर्श करावा लागेल. हा अ‍ॅप सर्व नव्या अ‍ॅड्राईड स्मार्टफोन्सवर काम करते. हे अ‍ॅप फेसबुक मेसेंजर, हँगआऊटस आणि व्हॉटसअ‍ॅप वर उत्तम काम करते.
आयएफटीटीटीः याचे पूर्ण नाव आहे इफ धीस देन डेट या अ‍ॅपच्या सेटिंगच्या पर्यायात जाऊन अँड्रॉईड एसएमएस वर टॅप करावे लागते. त्यानंतर पिक एनी न्यू एसएमएस रिसिव्हड नंतर अँड्रॉईड एसएमएस आणि सेंड एन एसएमएस निवडायचे. त्यानंतर आपला एसएमएस टाईप करायचा आहे. मग एखादा एसएमएस आला तर हे अ‍ॅप रिप्लाय देते.
ऑटो रिप्लाय टेक्स मेसेजः अ‍ॅड्रॉईड यूजर्स साठी उत्तम अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या मदतीने कार चालवताना कॉल्स किंवा एसएमएस ला ऑटो रिप्लाय करू शकतो. त्यामध्ये आपल्याला एक फोन क्रमाकांची यादी बनवावी लागते. कोणताही मेसेज आला तर फक्त रिप्लाय बटणावर टॅप किंवा स्पर्श करावा लागतो. या अ‍ॅप चे पेड व्हर्जन म्हणजे पैसे भरले तर टेक्स्ट टू स्पीच चा पर्यायही मिळतो. त्याचबरोबर मिस्ड कॉल्स किंवा येणार्‍या एसएमएस ला व्हिडिओ किंवा व्हॉईस मेसेजने ऑटो रिप्लास करू शकतो.
ऑटो एसएमएस लाईटः आपल्या अ‍ॅड्रॉईड फोन मध्ये आपण हे अ‍ॅप टाकून घेऊ शकतो. या अ‍ॅपच्या मदतीने इनकमिंग आणि मिस्ड कॉल वर ऑटो रिप्लाय करू शकतो. जेव्हा आपण कार चालवत असू तेव्हा फक्त ड्रायव्हिंग मोड ऑन करायचा आहे. सेटिंग्ज मध्ये जाऊन मेसेज टाईप करावा लागेल. शक्य असल्यास लोकेशनचा पर्यायही सुरू ठेवू शकतो. मेसेजला रिप्लाय करताना लोकेशनची माहिती शेअर करू शकतो.

Check Also

फेसबुकवरुन व्यवहार करताना…

फेसबुकवरून आपण खरेदी विक्री देखील करू शकतो. परंतु आर्थिक व्यवहार करताना सुरक्षितता पाहणे अगोदरच गरजेचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *