राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड विरोधकांबरोबर भेदभाव करतात. धनखड हे सभागृहात आपल्याला बोलू देत नाही. सभापती हे पक्षपाती भूमिका घेत वावरत असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच राज्यसभेच्या सभापतीविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. दरम्यान, बुधवारीही सभागृहात झालेल्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. दुसरीकडे लोकसभेतही झालेल्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले होते.
गेल्या दोन आठवड्यापासून दिल्लीत संसदेच्या दोन्ही सभागृहाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या दोन आठवड्याच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून गोंधळ घालत आहेत. अशात मंगळवारी सत्ताधारी व विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी राज्यसभेचे कामकाज पुन्हा गदारोळामुळे स्थगित करण्यात आले. संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत सतत गदारोळ सुरू होता. त्यातच उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावर पक्षपाती कारभार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अविश्वास प्रस्तावावर सुमारे 50 खासदारांनी स्वाक्षर्या केल्या. त्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, द्रमुक आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांचा समावेश आहे. भारताच्या 72 वर्षांच्या संसदीय इतिहासातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई ठरली आहे.
विरोधी पक्षांनी घटनेतील कलम 67-बी अन्वये धनखड यांना पदावरून हटवण्याची मागणी करत राज्यसभेमध्ये प्रस्ताव सादर केला. काँग्रेसकडून जयराम रमेश आणि प्रमोद तिवारी यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे नदीम उल हक आणि सागरिका घोष यांनी हा प्रस्ताव राज्यसभेच्या सेक्रेटरी जनरल यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र ,विरोधकांनी आणलेल्या या प्रस्तावावर सोनिया गांधी आणि अन्य कुठल्याही पक्षाच्या फ्लोअर लीडर्सच्या सह्या नाहीत.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात आमचा व्यक्तिगत संघर्ष नाही. मात्र ते केंद्र सरकारचे मोठे प्रवक्ते आहेत. राज्यसभेच्या कामकाजात सर्वात मोठा अडथळा आणण्याचे कारण स्वत: राज्यसभा सभापतीच आहेत. त्यांच्या वागण्याने देशाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. लोकशाही, राज्यघटना आणि त्यावर बराच विचार केल्यानंतर आम्ही संसदीय लोकशाहीच्या इतिहासात प्रथमच राज्यसभा सभापतींविरोधात अविश्वास ठरावासाठी नोटीस आणली आहे. त्यांच्या वर्तनामुळे आम्हाला त्यांच्याविरोधात अविश्वास ठरावासाठी नोटीस आणावी लागली आहे, अशा शब्दांमध्ये जगदीप धनखड यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला. ते धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावावर बोलत होते.
इंडिया आघाडीने राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावार टीका संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजेजू म्हणाले की, शेतकर्याचा मुलगा देशाचा उपराष्ट्रपती झाला आहे, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. सभापतींच्या प्रतिष्ठेवर जर कोणी हल्ला करत असेल तर तो सहन करणार नसल्याचेही रिजेजू म्हणाले. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नड्डा म्हणाले की, आमचे खासदार सोनिया गांधी आणि जॉर्ज सोरोस उठवत आहेत. हा देशाच्या संप्रभुतेचा विषय आहे. सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणून देशाच्या संप्रभुतेच्या मुद्यावरून नागरिकांचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे. सर्वांनी याचा निषेध केला पाहिजे, असे ते म्हणाले.
Check Also
राहुल गांधीनी पोलिसी हत्येकेडे वेधले लक्ष
परभणी हिंसाचारात अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …