लेख-समिक्षण

एका सिएची यशोकहाणी

भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश मिळते; तर काहींना खूप मेहनत घ्यावी लागते. भवताली मेहनतीतून यशाची शिखरे गाठणार्‍या अनेक व्यक्ती दिसतात. त्यातून आपण प्रेरणा घ्यायची असते. अशीच एक प्रेरक गाथा आहे यंदाच्या चार्टर्ड अकौंटंट अर्थात सनदी लेखापाल या कठीण परीक्षेत यश मिळवणार्‍या एका शेतकरी कुटुंबातील तरुणाची….
बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील बेलौन या छोट्याशा गावातल्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या राकेश झा या तरुणाचे सुरुवातीचे शिक्षण सरकारी शाळेत झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असूनही त्याने अभ्यास करण्यात माघार घेतली नाही. त्याच्या सहावी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च गावातील शिक्षक मनोज झा यांनी उचलला. राकेशने भागलपूरच्या मारवाडी कॉलेजमधून बारावी आणि बी.कॉम.चे शिक्षण पूर्ण केले. या काळात पंकज टंडनसरांनी त्यांना सीए होण्यासाठी प्रेरित केले, ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले. बारावीनंतर राकेश पहिल्याच प्रयत्नात सीपीटी परीक्षा उत्तीर्ण करून दिल्लीला पोहोचला.
इथे त्याने आर्टिकलशिप आणि सीए फायनलची तयारी केली. या काळात त्याला कुटुंबीयांची साथ मिळाली नाही आणि त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला प्रत्येक पावलावर साथ दिली.
कधी रूमचे भाडे भरण्यात, तर कधी उदरनिर्वाहासाठी राकेशच्या मित्रांनी त्याला मदत केली. त्याच्या सीए अंतिम परीक्षेचे शुल्कही त्यांनी भरले होते. या पाठिंब्यामुळे राकेशला आर्थिक चणचण असतानाही त्याची स्वप्ने पूर्ण करण्यास हातभार लागला. राकेशच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती जरी कमकुवत असली तरी त्यांनी त्याला प्रत्येक पावलावर प्रोत्साहन दिले. त्याची बहीण आणि भावजय यांनीही त्याला सर्वतोपरी साथ दिली. एक मुलाखतीत राकेशने संगितले होते की, त्याच्या मित्रांची मदत ही त्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे.
अगदी उदरनिर्वाहाची व्यवस्था नसतांनाही ध्येयपूर्ती होऊ शकते ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही काय?

Check Also

वार्धक्य रोखायचंय?

वार्धक्य रोखण्याबाबत सतत नवनवे संशोधन होत असते. आहारातील बदलही यासाठी उपयुक्त ठरत असतात. कमी कर्बोदके …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *