निसर्गही कधी कधी अनोखी दृश्ये दाखवत असतो. आकाश कधी विभागले गेल्याचे तुम्ही पाहिले आहे का? असेही दृश्य आता पाहायला मिळाले आहे. आकाशाचा एक भाग केशरी रंगाचा आणि दुसरा काळवंडलेला असे दोन उभे भाग नुकतेच अमेरिकेत फ्लोरिडामध्ये पाहायला मिळाले. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सूर्यास्त तर आपण रोजच पाहतो.
संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य अस्ताला जातो तेव्हा आकाशात पसरलेला तो केशरी, सोनेरी रंग मन मोहून टाकतो. आकाशात पसरलेल्या या सोनेरी रंगाच्या छटा खूपच सुंदर दिसतात, पण एकाचवेळी आकाशात सूर्य अस्ताला जाताना पसरलेला सोनरी रंग आणि ढगाळलेले, ’मेघश्यामल’ आकाश असा नजारा तुम्ही कधी पाहिला आहेत का. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या दृश्याला ’स्प्लिट स्क्रीन’ सूर्यास्त असे म्हटले जाते. अलीकडेच फ्लोरिडामध्ये हे दृश्य दिसले आहे. सोशल मीडियावर याचे फोटो व व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात आकाश दोन हिश्श्यात विभागले गेल्याचे दिसत आहे. एका ठिकाणी केशरी आकाश दिसत आहे तर दुसरीकडे काळवंडलेले आकाश दिसत आहे. हा एक निसर्गाचा चमत्कारच म्हणून शकता. आता तुम्ही विचार कराल की हे कसे घडले? तर याचे उत्तर ढगांमध्ये लपले आहे. जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा आकाशातील उजव्या बाजूच्या भागातील ढग आकाशात खूप उंचावर असतात. त्यामुळे अजूनही ते सूर्याची काही किरणे ग्रहण करू शकतात. तर, याच वेळी काही ढग खाली येतात. जे सूर्याची किरणे पूर्णपणे रोखतात. ढगांचा एक खोल थर तयार होतो आणि तो पूर्णपणे गडद दिसतो. प्रकाश आणि सावलीचे हे विरोधाभासी दृश्य आकाशात दिसते.
Check Also
प्रेरणादायी संघर्षगाथा
कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली तर कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत …