झी मराठी पुरस्कार सोहळ्यात एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. ’लक्ष्मी निवास’ असे या मालिकेचे नाव आहे. विशेष म्हणजे या मालिकेत दिग्गज कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे. या मालिकेद्वारे ‘पाठकबाई’ अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर पुनरागमन करणार आहे. तिच्यासोबतच हर्षदा खानविलकर सुद्धा झी मराठीवर पुनरागमन करत आहे. यात अभिनेते तुषार दळवी सुद्धा पाहायला मिळतील. ’लक्ष्मी निवास’ या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी या दोघांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. लक्ष्मी आणि शीनिवास या भूमिका हे दोघंही साकारणार आहेत.
शीनिवास हे एका कार कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत असतात, तर लक्ष्मी गृहिणी असतात. आपल्या मुलींचं थाटामाटात लग्न व्हावं आणि आपण हक्काचं घर बांधावं असं यांचं स्वप्न असतं. या स्वप्नादरम्यानचा प्रवास ’लक्ष्मी निवास’ मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लक्ष्मी आणि शीनिवास यांच्या मुलीची भूमिका मालिकेत अक्षया देवधर साकारणार आहे. पुन्हा एकदा अक्षयाला पाहण्यासाठी आता चाहते देखील उत्सुक आहेत.- स्वाती देसाई
Check Also
लार्जर दॅन लाईफ
हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …