अंधमित्रांना कुठेही सहजगत्या फिरता येणे तसे अवघड असते. अनेक अंधमित्रांनी त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर मोठी आव्हानं सहज पार केली आहेत. परंतु प्रत्येकालाचे ते शक्य नसते. अंधमित्रांना वावरणे सहज व्हावे यासाठी एक अंगठीसारख़े एक भारतीय युवकाने विकसित केले आहे. त्यामुळे अंधमित्रांना पांढरी काठी घेऊन चालण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे अंधांच्या वावरण्यास केवळ मूलभूत सुधारणा होणार नाही तर पांढरी काठी वापरण्याची गरजही उरणार नाही.
आयआयटी खरगपूर मधील अभिनव वर्मा आणि त्याच्या काही मित्रांनी नेहमीपेक्षा वेगळा विचार केला. अंधासाठीचे यंत्र बनवताना अभिषेक ने एम्ब्रोस नावाची कंपनी स्थापन केली आणि या यंत्राचा आकार आणि त्याची उपयोगिता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अनंतवेळा चाचण्या घेऊन आणि प्रयोग करून त्याने एक लहान आकाराचे आणि अद्ययावत असे लाईव्ह ब्रेल नावाचे केवळ ग्रॅम वजन असणारे युनिट तयार केले. आपले अंधमित्र जी पांढरी काठी वापरतात तिच्या वजनापेक्षा हे युनिट हलके आहे. ते बोटात अंगठी सारखे घातले जाऊ शकते आणि अंधमित्र हे घालून बाहेर सहजरित्या फिरु शकतील असे हे जगातले सर्वात लहान आणि हलके डिव्हाईस आहे.
लाईव्ह ब्रेल हे डिव्हाईस त्याच्या 4 मीटर अंतर मार्गातले अडथळे ओळखू शकते. या डिव्हाईस मधून एका सेकंदाला पन्नास अल्ट्रासोनिक स्पंदने निघत असतात जी स्पर्शामुळे ताबडतोब अभिप्राय वापरकर्त्याला देतात. ज्यामुळे अंधमित्र वाटेतले अडथळे टाळून पुढे जाऊ शकतात. या डिव्हाईसच्या वापरामुळे नेमके अडथळे कुठे आहेत, किती लांब आहेत, ते हलणारे आहेत की नाहीत, अडथळ्यांचे स्वरुप आणि इतर गोष्टींचे ज्ञान वापरकर्त्याला करून देते. त्यानुसार वापरकर्त्याला कंपनांच्या तीव्रतेमुळे अडथळ्यांचा अंदाज येतो आणि ते तिथून जाऊ शकतात. लाईव्ह ब्रेल हे डिव्हाईस अंध मित्रांना त्यांच्या मार्गातल्या अडथळ्यांविषयी पूर्वकल्पना देत असल्यामुळे त्यांना आत्मविश्वासाने ते टाळून पुढे जाता येते. आपल्या या शोधाने अंधमित्र विनाअडथळा ना केवळ चालू शकतात तर पळू सुद्धा शकतील हे पाहून अभिनव आणि त्याच्या सहकार्यांना नक्कीच आनंद झाला आहे.
Check Also
जग काय म्हणेल?
जगातला प्रत्येक माणूस हा युनिक आहे. एकाहून दुसरा संपूर्णपणे वेगळा आहे. अगदी जुळी भावंडही वेगवेगळी …