लेख-समिक्षण

नाव बदलला!

हिमालयात वगैरे जाण्याची पैज लावली जाते; पण ज्या नावात आपला जीव अडकलेला असतो, ते बदलण्याची पैज लावणारा आणि मुख्य म्हणजे पाळणारा नेता आंध्र प्रदेशात नुकताच पाहायला मिळाला. राज्याचे माजी मंत्री आणि वायआरएस काँग्रेसचे नेते मुद्रगदा पद्मनाभम यांनी हा विक्रम त्यांच्या ‘नावावर’ केलाय. आंध्र प्रदेशच्या राजकारणात बरीच उलथापालथ नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाहायला मिळाली. चंद्राबाबू नायडूंच्या यशाबरोबरच जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण यांचीही तिथे जोरदार चर्चा आहे. परंतु ते पिथापुरम या त्यांच्या मतदारसंघातूनच निवडून येणार नाहीत, असं मुद्रगदा पद्मनाभन यांना वाटत होतं. पवन कल्याण विजयी झाले, तर आपण आपलं नाव बदलू, असं आव्हान त्यांनी दिलं होतं. परंतु पवन कल्याण यांनी प्रचंड मोठा विजय मिळवला आणि पद्मनाभम अडचणीत आले. आपल्याकडे असं काही घडलं असतं तर आव्हान देणारा नेता फारतर सात-आठ दिवस विजनवासात गेला असता आणि त्यानंतर पुन्हा पूर्वीच्याच आवेशात नव्यानं डरकाळ्या फोडू लागला असता. परंतु मुद्रगदा पद्मनाभम यांनी वचन पाळलं. आपल्या नावातील ‘मुद्रगदा’ हा शब्द त्यांनी काढून टाकलाय आणि यापुढं ते ‘पद्मनाभम रेड्डी’ नावानं ओळखले जाणार आहेत. पद्मनाभम हे निवडणुकीपूर्वीच त्यावेळच्या सत्ताधारी वायएसआर काँग्रेेसमध्ये गेले होते. परंतु वायएसआर काँग्रेसइतक्याच जागा जनसेना पक्षाने मिळवल्या. पवन कल्याण आता उपमुख्यमंत्री झालेत… पण गाजले मात्र पद्मनाभम… कारण शब्दाला जागून त्यांनी नाव बदलून घेतलं. या घटनेमुळं महाराष्ट्रातले नेते कमालीचे हादरलेत म्हणे! कारण दिलेला शब्द पूर्ण करण्याचा ‘ट्रेन्ड’ सुरू झाला तर मंचावरून बोलायचं तरी काय?

Check Also

जा एकदाची..!

जगात येण्यासाठी संघर्ष, जगात आल्यावर तिरस्कार, घृणा, अवहेलना, भीती, धसका, कुचंबणा, निराशा… पावलोपावली! तरीसुद्धा चिकाटीनं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *