लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. ते सलग दुसर्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. एनडीएतील सगळ्याच घटक पक्षांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यानंतर आवाजी मतदान घेण्यात आलं. ठाकरेसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेस खासदार के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.
अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजप खासदार ओम बिर्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बिर्ला यांचे अभिनंदन केले. या तिन्ही नेत्यांनी बिर्ला यांना अध्यक्षांच्या आसनावर बसवले. बिर्ला यांच्या कामकाजाचं पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. तुम्ही दुसर्यांदा या पदावर विराजमान होत आहेत, हे या सदनाचे भाग्य आहे. तुम्हाला माझ्याकडून आणि सदनाकडून खूप-खूप शुभेच्छा. अमृतकालाच्या महत्त्वपूर्ण कालखंडात दुसर्यांदा या पदावर तुमची निवड झाली आहे. तुम्हाला अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. तुमचे मार्गदर्शन 5 वर्षे आम्हाला मिळत राहील’, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
ओम बिर्ला यांची निवड आवाजी मतदानाने झाल्यानंतर संसदेत एक दुर्मीळ दृष्य पाहायला मिळाले. आवाजी मतदानानं बिर्ला यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि किरण रिजीजू त्यांच्या आसनाकडे पोहोचले. त्यांनी बिर्ला यांचे अभिनंदन केले. मग पुढच्या काही क्षणांमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधीही बिर्ला यांच्या आसनाजवळ गेले. त्यांनी बिर्ला यांचे अभिनंदन केले. शेजारी उभ्या असलेल्या मोदींशीही त्यांनी हस्तांदोलन केले.
Check Also
तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय …