बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. हुमाने अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयाने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. अशात ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती चित्रपटामुळे नाही तर बॉयफ्रेंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
नुकतेच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न समारंभ पार पडले. सोनाक्षी आणि झहीरने भव्य रिसेप्शन दिले. ज्यामध्ये कुटुंबासह खास मित्रांनीही सहभाग घेतला आहे. तिची बेस्ट फ्रेंड हुमा कुरेशी यावेळी उपस्थित होती. या दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटो दिसणार व्यक्ती हुमाचा बॉयफ्रेंड असल्याचे बोलले जात आहे. अफवा असलेला बॉयफ्रेंडच नाव रचित सिंग आहे. रचित आणि हुमाचे एकत्रित फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर सर्वजण रचित सिंह कोण असा प्रश्न विचारत आहेत.
हुमा कुरेशी या वर्षाच्या सुरुवातीपासूनच तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. हुमा कुरेशीचे नाव ज्या व्यक्तीशी जोडले जात आहे ती व्यक्ती दुसरी कोणी नसून रचित सिंग आहे. रचित सिंग हा मुंबईचा प्रसिद्ध अभिनय प्रशिक्षक आणि महत्त्वाकांक्षी अभिनेता आहे.
रचितने आलिया भट्ट, रणवीर सिंग, वरुण धवन, विकी कौशल, अनुष्का शर्मा यांसारख्या अनेक कलाकारांसोबत अभिनय प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. रचित नुकताच रवीना टंडनच्या कर्मा कॉलिंग या वेब सीरिजमध्येही दिसला होता. या मालिकेत त्याने वेदांतची भूमिका साकारली होती. दरम्यान रचितपूर्वी हुमाने दिग्दर्शक आणि पटकथा लेखक मुद्दसर अजीजला डेट केले होते. तीन वर्षेडेटिंग केल्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. – जान्हवी शिरोडकर
Check Also
छप्परफाड कमाई
‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स …