टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळविणार्या भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची निवड करण्यात आल्याने आगामी कालावधीमध्ये भारतीय क्रिकेटला निश्चितच वेगळी दिशा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.एक खेळाडू म्हणून गौतम गंभीर यांची कारकीर्द निश्चितच महत्त्वाची होती. 2007 ची पहिली टी20 विश्वचषक स्पर्धा असो किंवा त्यानंतर 2011 मध्ये भारताने जिंकलेली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा असो या दोन्ही स्पर्धेमध्ये 11 खेळाडूंमध्ये गौतम गंभीरचे प्रमुख स्थान होते आणि अंतिम फेरीमध्ये त्याने चांगली कामगिरी करून भारताला विश्वचषक जिंकून दिला होता.
गौतम गंभीरने वयोगटातील स्पर्धांमध्ये आपल्याशी भेदभाव कसा केला गेला हे उघड केले. तो म्हणतो, ’मी कदाचित 12 किंवा 13 वर्षांचा होतोे, जेव्हा मी प्रथमच अंडर-14 स्पर्धेसाठी प्रयत्न केला, तेव्हा मी निवडकर्त्याच्या पाया पडलो नाही, त्यामुळे माझी निवड झाली नाही. तेव्हापासून मी स्वतःला वचन दिले की मी कधीही कोणाच्या पायाला हात लावणार नाही आणि मी कधीही कोणाला माझ्या पायाला हात लावू देणार नाही.गौतम गंभीर म्हणाला की, जेव्हा-जेव्हा त्याला अपयशाचा सामना करावा लागतो तेव्हा त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचाही उल्लेख केला जातो. तो म्हणाला, ’मला आठवते की जेव्हा मी माझ्या कारकिर्दीत अपयशी ठरलो, मग ते अंडर-16, अंडर-19, रणजी ट्रॉफी असो किंवा माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात असो. लोक म्हणायचे की तु शीमंत कुटुंबातून आला आहेस, तुला क्रिकेट खेळण्याची गरज नाही. तुझ्याकडे बरेच पर्याय आहेत, तु तुझ्या वडिलांच्या बिझनेस सांभाळ. हे टोमणे मला कायम ऐकायला मिळतात. त्यानंतर मी लोकांच्या या सर्व धारणांचा पराभव करायचे ठरवले. तो मी करू शकलो. निवृत्तीनंतर गंभीर समालोचक म्हणून सक्रिय आहे. आयपीएलच्या 2022 आणि 2023 मोसमात तो लखनौ सुपर जायंट्ससाठी मार्गदर्शक होता चापलुसी न करता स्वाभीमानाने सुध्दा यशोशिखरावर पोहचता येऊ शकते ही बाब वरील उदाहरणावरुन स्पष्ट होत नाही का?
Check Also
एका सिएची यशोकहाणी
भारतामध्ये प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. त्यातील अनेकांना सहज यश …