‘मधुबाला’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री दृष्टी धामी आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियाद्वारे ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने 2015 साली बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 9 वर्षानंतर दृष्टी आई होणार आहे.
अलीकडेच दृष्टी धामीने तिचे बेबी बंप फ्लाँट करतानाचे फोटो शेअर केले होते. मात्र काहींनी दृष्टीच्या बेबी बंपला फेक म्हटले. यावर आता दृष्टीने देखील यूजर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. दृष्टीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये मॅटर्निटी फोटोशूट केल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने ‘माझं बेबी बंप हे फक्त जेवणामुळे वाढलेलं पोट नाही, याचा हा पुरावा. जे लोक मला विचारत होते, तुम्हाला दिसत आहे का आता? असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचे समर्थन केले आहे.
शाहरुख खानला त्याच्या त्याच्या जीवनभरातील कारकिर्दीसाठी ’पार्दोअल्ला कॅरीरा एस्कोना-लोकार्नोटूरिस्मो’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील विविध शैलीतील 100 हून अधिक चित्रपटांमध्ये योगदान दिल्याबद्दल शाहरुखला महोत्सवात लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड किंवा लेपर्ड अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. शाहरुख खानला येत्या 10 ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमधील लोकार्नोयेथील प्लाझा ग्रांडे — मेघना ठक्कर
Check Also
लार्जर दॅन लाईफ
हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभराहून अधिक वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांनी आपल्या अभिनयसामर्थ्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळ …
i like this story