पृथ्वीवर नेपाळपासून अमेरिकेपर्यंतच्या चार महाखंडावरील वाढलेली उष्णता पाहून कमाल तापमानाचा नवा विक्रम प्रस्थापित करेल की काय असे वाटू लागले आहे. उष्णता आणि उष्णतेच्या लाटेमुळे मृत्युमुखी पडणार्यांची संख्या अगणित आहे. यावर्षी कडक उन्हामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक जणांना आजाराने ग्रासले आहे. एकट्या सौदी अरेबियात सर्वाधिक तापमान नोंदले गेले असून तेथे 900 पेक्षा अधिक बळी गेले. इजिप्तमध्ये 530 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतात 1 मार्च ते 18 जून या काळात 40 हजारापेक्षा अधिक नागरिक उन्हाने आजारी पडल्याची नोंद झाली आहे. जागतिक तापमानवाढ नव्या चक्रात प्रवेश करुन मानवी जीवनासाठी असह्य बनल्याचे हे द्योतक आहे.
थ्वीवर नेपाळपासून अमेरिकेपर्यंतच्या चार महाखंडावरील वाढलेली उष्णता पाहून यावेळचा उन्हाळा कमाल तापमानाचा विक्रम प्रस्थापित करेल की काय? असे वाटू लागले. उष्णता आणि उष्णतेच्या लाटेमुळे मृत्युमुखी पडणार्यांची संख्या अगणित आहे. तरीही यावर्षी उन्हामुळे हजारो लोकांचा मृत्यु झाला आहे. याशिवाय अनेक आजारी पडले. एकट्या सौदीत सर्वाधिक तापमान नोंदले गेले असून तेथे 900 पेक्षा अधिक बळी गेले. पैकी 70 पेक्षा अधिक भारतीय नागरिक आहेत. सौदीत 51 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान राहत असून ही बाब हज यात्रेकरुंसाठी अडचणीची ठरत आहे.
इजिप्तमध्ये 530 प पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यु झाला आहे. भारतात 1 मार्च ते 18 जून या काळात 40 हजारापेक्षा अधिक नागरिक उन्हाने आजारी पडले आणि त्यात शंभरपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. उष्णतेच्या लाटेने होणारे मृत्यू केवळ आशिया आणि आफ्रिका खंडापुरतीच मर्यादित नसून युरोपीय देशांत देखील मृत्युचे आकडे धक्कादायक आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेतही. यूएस नॅशनल ओशनिक अँड अॅटमास्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या ‘अर्थ ऑब्जेव्हेटरी’नुसार भूमध्य सागराजवळील देशांना सध्या उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पोर्तुगालपासून ग्रीसपर्यत आणि
Check Also
तारक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील 38 वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय …