दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि आमिर खानचा मुलगा जुनैद हे दोघे ‘वन डे’ या कोरियन प्रेमपटासाठी एकत्र आले आहेत. २०११ मध्ये हा प्रेमपट आला होता. निकोलस यांच्या २००९मध्ये आलेल्या ‘वन डे’ या कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे. अॅना हॅथवे आणि जिम स्ट्रूगेस यांनी यात अभिनय केला आहे. १५ जुलैला सेंट स्वीथून डे असतो. या दिवशी हे दोघे भेटतात. दोघांत कुठलेच साम्य नसते. तरीही ते एकत्र येतात. त्यानंतर दरवर्षी याच दिवशी दोघे एकमेकांना भेटत रहातात. अशी गाठभेट सलग २० वर्षेचालते. या दरम्यान दोघांच्या आयुष्याचा प्रवास अनेक चढउतारांनी भरलेला असतो. ‘आशिकी’ चित्रपटाच्या पोस्टरने ऐकेकाळी धमाल उडवली होती. ‘वन डे’चे पोस्टरही असेच आहे. सेंट मार्टिन कालव्याच्या जवळ दोघांचे चुंबन दृश्याचे पोस्टर त्यावेळी अमेरिकेत खूपच प्रसिध्द झाले होते.
जपानमधील सापोरो येथे ‘स्नो फेस्टीव्हल’ म्हणजेच बर्फाचा उत्सव साजरा केला जातो. हा चित्रपट याच गावात चित्रीत करण्याचा आमिर खानचा मानस आहे. या चित्रपटाची फारशी माहिती नसली तरी डिसेंबर २०२३ मध्ये मुंबईत त्याचे चित्रीकरण सुरु झाले. जपानमधील चित्रीकरणा दरम्यान टिपलेली दोघांची छायाचित्रे नुकतीच व्हायरल झाली आहे. हा चित्रपट ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रदर्शित करण्याचे आमिर खानचे प्रयत्न आहेत. सुनील पांडे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. — विधिषा देशपांडे
Check Also
अमिताभ बनणार जटायू
बॉलीव्ाुडमधला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’मध्ये अनेक महत्वाच्या भूमिकांसाठी तितक्याच सशक्त अभिनेत्यांची निवड करण्यात आली आहे. सर्वात …