लेख-समिक्षण

व्हॉट्सअपची कोलांटउडी

व्हॉट्सअपच्या निर्मात्यांनी कधीकाळी अभिमानाने म्हटले होते की या सोशल मीडियावर कधीही जाहीरात दिसणार नाही ना कोणत्याही प्रकारचे खेळ. म्हणजेच सतत जाहीरातींचा मारा करणारे अन्य मेसेंजिग प्लॅटफॉर्म जसे फेसबुक आणि इन्स्टाग्रामप्रमाणे आमचे प्लॅटफॉर्म नसेल. अर्थात या दोन्ही प्लॅटफॉर्मवर दिसणार्‍या जाहीरातींनी युजर त्रस्त झाले आहेत. फेसबुकने २०१४ रोजी व्हॉट्सअप ताब्यात घेतले आणि तेव्हापासून त्यांनी जाहीरात न दाखविण्याचे दिलेले आश्वासन पाळले. मात्र आता सध्याची स्थिती पाहता आश्वासन बासनात गुंडाळून ठेवले असून व्हॉटसअपने जाहीरात दाखविण्यास सुरुवात केली आहे.
नितिमत्तेची हद्द
व्हॉट्सअपचे मुळ संस्थापक ब्रायन अ‍ॅटन आणि जान कुम यांनी जाहीरात दाखविण्यास विरोध केला होता. त्यांनी २०१८ मध्ये याच मुद्यावर नाराजी व्यक्त करत ‘मेटा’ला सोडचिठ्ठी दिली होती. ‘मेटा’ने जाहीरात दाखविण्याची तयारी केली तेव्हा या दोघांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. अ‍ॅटन आणि कुम यांनी याबाबत नितीमत्ता पाळली. परंतु आता सात वर्षांनंतर ज्याची भीती वाटत होती तेच घडताना दिसत आहे.
अपडेटने प्रारंभ
सध्या व्हॉट्सअपच्या अपडेट नावाच्या टॅबवर जाहिराती झळकणार आहेत. ‘व्हॉट्सअप’मध्ये तळाशी चार टॅब चॅट्स, अपडेट्स, कम्युनिटीज आणि कॉल्स असतात. ‘अपडेट’ला लिक करत युजर आपले स्टेटस आणि आणि चॅनेलला जोडू शकतात. सुमारे दीड अब्ज युजर दररोज या फीचरचा वापर करतात. या ठिकाणी तीन प्रकारचे बदल दिसतील. पहिले म्हणजे मित्रांचे स्टेट्स पाहताना अधूनमधून जाहिराती दिसतील. दुसरे म्हणजे युजर आता व्हॉट्सअप चॅनेल पाहू शकतील आणि तिसरा बदल म्हणजे टारगेटेड जाहिरातीचे असून यानुसार फेसबुक, इन्स्टाग्रामला स्वत:चे व्हॉट्सअप अकाउंटला लिक करणार्‍या युजर्सना आवडीप्रमाणे जाहिराती दिसू लागतील.
कंपनीची हतबलता
अर्थात ‘मेटा’ने आताच व्हॉट्सअपवरून जाहिराती दाखविण्याचा निर्णय आताच का घेतला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अर्थात त्याचे एकच उत्तर उत्पन्नवाढीचा दबाव. प्रामुख्याने कंपनीकडून एआयच्या विकासावर मोठा खर्च होत असताना उत्पन्न वाढविणे गरजेचे ठरते. यावर्षी ‘एआय’साठी ५० अब्ज डॉलर खर्च करण्याचे नियोजन आहे. ‘स्केल एआय’ नावाच्या एका एआय स्टार्टअपचा ताबा घेण्यासाठी त्यांनी १४.३ अब्ज डॉलरचा खर्च केला आहे. जागतिक बाजारातील मंदीचे सावट अजूनही ओसरलेले नाही. अशावेळी ‘मेटा’ साठी अन्य प्लॅटफॉर्म सुमारे १६० अब्ज डॉलरचा महसूल गोळा करून देत असतील तर व्हॉट्सअपचे तीन अब्ज युजर हे एखाद्या दुभत्या गायीप्रमाणे दिसत आहेत.
या जाहिरातीच्या प्रवेशामुळे होणारा बदल म्हणजे आता व्हॉटसअप आता केवळ तुमचे खासगी कम्युनिकेशनचे टूल राहणार नाही. ते युट्यूब आणि फेसबुकप्रमाणेच एक कंन्टेट प्लॅटफॉर्म म्हणून नावारुपास येईल. म्हणूनच बहुतांश लोकांना व्हॉट्सअपवर स्वत:ची गोपनीयता आता पूर्वीसारखी सुरक्षित राहणार नाही, याची भीती वाटत आहे.
खासगीपणाचा प्रश्न
अनेकजण खासगीपणाला फारसे महत्त्व देत नाहीत. कदाचित जागरुकतेचा अभाव असल्याने अशा युजर्सना गांभीर्य नसावे. पण या बदलामुळे व्हॉटसअपचे स्पर्धक टेलिग्रॅम आणि ‘सिग्नल’सारखे अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना संधी मिळेल. कारण हे दोन्ही प्लॅटफॉर्म खासगीपणाबाबत अधिक सजग मानले जातात. तूर्त जाहिरातीला एका प्रयोगाच्या माध्यमातून एका मर्यादेपर्यंत आणले जात आहे.कालांतराने त्याची संख्या, व्यूज आणि मूल्यांत वाढ होईल. शेवटी मोफतमध्ये एवढी सेवा इतया काळापासून आणि तेही व्यापक प्रमाणात कशी मिळेल?
– बालेंदू शर्मा दाधिच, ज्येष्ठ आयटीतज्ज्ञ

Check Also

‘लालपरी’ला गरज आर्थिकदृष्ट्या सक्षमतेची

राज्यात प्रवासी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणार्‍या राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. …